गयाना WI vs SA 2nd Test : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आणि सामना अनिर्णित राहिला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमानं शानदार खेळी केली. त्यानं 182 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं सर्वाधिक 86 धावा केल्या. मात्र, दुसऱ्या डावात 15 धावा करुन तो नाबाद राहिला. तर, वेस्ट इंडिजच्या कर्णधाराच्या कामगिरीबद्दल बोलायचे झालं तर, क्रेग ब्रॅथवेटची बॅट शांत होती. त्यानं पहिल्या डावात 131 चेंडूंचा सामना केला आणि 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 35 धावा केल्यानंतर तो बाद झाला. त्याचवेळी त्याला दुसऱ्या डावात खातंही उघडता आलं नाही. तसंच वेस्ट इंडिजच्या अलिक अथनाजेनं स्फोटक खेळी खेळली. मात्र, तो त्याच्या शतकापासून फक्त 8 धावांनी दूर होता. (south africa vs west indies)
आता दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ही कसोटी जिंकून मालिका जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. (where to watch south africa national cricket team vs west indies cricket team)
- वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी खेळला जाईल?
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून (15 ऑगस्ट 2024) खेळवला जात आहे.
- वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कुठं खेळवला जाईल?
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे.
- वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना किती वाजता खेळला जाईल?