ETV Bharat / sports

कीवी संघ नव्या वर्षात पहिला सामना जिंकत पाहुण्यांना क्लीन स्वीप करणार? शेवटची मॅच 'इथं' पाहा लाईव्ह - NZ VS SL 3RD T20I

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका क्रिकेट संघांमध्ये तीन सामन्यांची T20 मालिका सुरु आहे. यात यजमान कीवी संघानं 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

NZ vs SL 3rd T20I Live
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (NZC Social Media)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 1, 2025, 12:39 PM IST

नेल्सन NZ vs SL 3rd T20I Live Streaming : न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा T20 सामना 3 जानेवारी रोजी खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना नेल्सन येथील सॅक्सटन ओव्हल इथं भारतीय वेळेनुसार पहाटे 5:45 वाजता सुरु होईल.

कीवींनी मालिका जिंकली : पहिल्या T20 सामन्यात न्यूझीलंडनं श्रीलंकेचा आठ धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या T20 मध्ये कीवी संघानं पाहुण्या संघाचा 45 धावांनी पराभव केला. यासह यजमान संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. आता तिसरा T20 जिंकून श्रीलंकेचा सफाया करण्याचं कीवी संघाचं लक्ष्य असेल. तर दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ क्लीन स्वीप टाळण्याच्या इराद्यानं तिसऱ्या T20 सामन्यात उतरणार आहे. त्यामुळं दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

दुसऱ्या T20 सामन्यात काय झालं : दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघानं 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला 20 षटकात 187 धावा करायच्या होत्या. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 19.1 षटकांत अवघ्या 141 धावा करुन सामना जिंकण्यात अपयशी ठरला.

दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 27 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात न्यूझीलंड संघाचं पारडं जड आहे. न्यूझीलंड संघानं 16 T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेच्या संघाने केवळ 10 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही. न्यूझीलंडमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 10 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात न्यूझीलंड संघानं आठ सामने जिंकले असून एक सामना गमावला आहे. त्याच वेळी, 1 सामना बरोबरीत सुटला आहे.

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी : श्रीलंकेच्या संघानं आतापर्यंत एकूण 202 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत, ज्यात श्रीलंकेच्या संघानं 91 सामने जिंकले आहेत. तर 109 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याच वेळी, 2 सामन्यांचा निकाल लागला नाही. एकूण विजयाची टक्केवारी 45.50 आहे. दुसरीकडं, न्यूझीलंड संघानं आतापर्यंत एकूण 224 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत, ज्यात न्यूझीलंड संघानं 116 सामने जिंकले आहेत. तर 100 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचवेळी एक सामना बरोबरीत सुटला आणि सात सामन्यांचा निकाल लागला नाही. एकूण विजयाची टक्केवारी 51.35 आहे.

सॅक्सटन ओव्हलची खेळपट्टी कशी असेल : सॅक्सटन ओव्हलची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत करेल आणि स्विंग दिसेल. त्यामुळं वेगवान गोलंदाजांना फलंदाजांना अडचणीत आणण्याची संधी मिळते. तथापि, जर फलंदाज नवीन चेंडूच्या धोक्याचा यशस्वीपणे सामना करु शकले तर ते मैदानाच्या लहान आकाराचा वापर करु शकतात आणि धावा करु शकतात. पण फिरकीपटूंना खेळपट्टीवरुन फारशी मदत मिळणार नाही. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा T20 सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना 3 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 05:45 वाजता नेल्सन येथील सॅक्सटन ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल, ज्याची नाणेफेक अर्धा तास आधी होईल.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा T20 कुठं आणि कसा पाहावा?

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा T20 सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येईल. याशिवाय, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर पाहता येईल.

सामन्यासाठी दोन्ही संघ :

न्यूझीलंड : टिम रॉबिन्सन, रचिन रवींद्र, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मिचेल हे (यष्टिरक्षक), मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), झकरी फॉल्केस, मॅट हेन्री, जेकब डफी, बेव्हॉन जेकब्स, नॅथन स्मिथ.

श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टिरक्षक), कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कामिंदू मेंडिस, चरिथ असलंका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, बिनुरा फर्नांडो, मथिशा पाथिराना, नुवान तुषारा, भानुका राजकुमार फरनांडो, भानुका राजपाक्षे, नुवान फर्नांडो, चारिथ असालंका, दिनेश चंडिमल, जेफ्री व्हेंडरसे

हेही वाचा :

  1. 127/3 ते 141/10... पाहुण्यांचे 'मागचे पाढे पंचावन्न'; 'कीवीं'नी मालिका जिंकली
  2. 699/10... पाहुण्यांनी उभारला धावांचा हिमालय; दोन फलंदाजांची द्विशतकं तर एकाचं शतक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.