सातारा : उत्तर प्रदेशमधील महाकुंभ मेळाव्याला (Mahakumbh 2025) जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम विभागाकडून विशेष गाडी सुरू करण्यात आलीय. 14 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारी रोजी हुबळी-बनारस-हुबळी (क्र.07383) ही विशेष एक्स्प्रेस मिरजमधून दुपारी 1:35 वाजता धावणार आहे.
सातारा, कराडमध्ये एक्स्प्रेसला थांबा : महाकुंभ मेळाव्यासाठी सुरू करण्यात आलेली ही विशेष एक्स्प्रेस दुपारी 02:30 वाजता किर्लोस्करवाडी, दुपारी 3 वाजता कराड आणि सातारा येथून दुपारी 04:05 वाजता निघेल. प्रयागराज येथे अनुक्रमे 15 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2025 रोजी रात्री 08:30 वाजता पोहोचेल.
- 'असं' आहे परतीचं वेळापत्रक : प्रयागराज येथून 17 फेब्रुवारी, 24 फेब्रुवारी आणि 3 मार्च 2025 रोजी ही विशेष एक्स्प्रेस सकाळी 08:55 वाजता परतीच्या प्रवासासाठी निघेल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 07:40 वाजता ती मिरज जंक्शन येथे पोहोचेल.
सातारा, सांगली जिल्ह्यात चार ठिकाणी थांबा : महाकुंभ मेळाव्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या विशेष एक्स्प्रेसला सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा या ठिकाणी थांबा देण्यात आलेला आहे. मध्य रेल्वेचे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत, पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी (कराड), शिवनाथ बियानी (कोल्हापूर), ॲड. विनित पाटील (सातारा) यांनी ही गाडी मंजूर करुन घेतली आहे.
भाविकांनी लाभ घेण्याचं आवाहन : "महाकुंभ मेळाव्यासाठी जाणाऱ्या भाविकांनी या विशेष गाडीचा लाभ घ्यावा," असं अवाहन रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शनचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, मधुकर साळुंखे, वाय. सी. कुलकर्णी, पंडितराव कराडे, श्रीकांत माने, जयगौंड कोरे, पांडुरंग लोहार यांनी केलं आहे.
हेही वाचा -