मुंबई : शाहरुख खाननं सोमवारी त्याचा मुलगा आर्यन खानच्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा शो लॉन्च केला. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'द्वारे आर्यन मनोरंजन क्षेत्रात एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे. बॉलिवूड 'बादशाह'नं त्याच्या मुलांसाठी चाहत्यांना एक खास विनंती केली आहे. 'किंग खान'नं आर्यनच्या शोबद्दल म्हटलं, "या शोमध्ये सहभागी झालेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानू इच्छितो. त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. मी या शोचे काही भाग पाहिले आहेत. हा शो खूप मजेदार आहे. मला मजेदार गोष्टी आवडतात. माझ्या विनोदांनी लोक नाराज होतात, अनेकांना वाईट वाटतं. मी विनोद करणं बंद केलं आहे. मी हा वारसा माझ्या मुलाला दिला. मी त्याला म्हटलं, 'जा बेटा, तुझ्या वडिलांचं नाव उज्ज्वल कर."
शाहरुखनं चाहत्यांना केली विनंती : याशिवाय सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे यामध्ये शाहरुखनं म्हटलं, "माझी फक्त एकच विनंती आहे, मी मनापासून अशी इच्छा करतो की, माझा मुलगा, जो दिग्दर्शनात पहिलं पाऊल टाकत आहे आणि माझी मुलगी (सुहाना खान), जी अभिनेत्री बनत आहे. त्यांना जर हे जग मला दिलेल्या प्रेमाच्या 50 टक्के जरी देत असेल तरी ते खूप जास्त होईल. आता शाहरुखच्या या व्हायरल व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. शाहरुखचं मनोरंजन क्षेत्रात खूप मोठं योगदान आहे. दरम्यान 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' हा शो रेड चिलीज एंटरटेनमेंट निर्मित आहे. या शोचं दिग्दर्शन आणि लेखन आर्यन खान, बिलाल सिद्दीकी आणि मानव चौहान यांनी केलं आहे. हा शो लवकरच नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.
शाहरुख खानचं वर्कफ्रंट : आर्यन खान बऱ्याच दिवसांपासून या शोमुळे चर्चेत आहे. हा शो कधी प्रसारित होईल याबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान 'किंग खान'च्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, तो शेवटचा राजकुमार हिरानीच्या 'डंकी' चित्रपटामध्ये तापसी पन्नू आणि विकी कौशलबरोबर दिला होता. आता पुढं तो मुलगी सुहाना खानबरोबर 'किंग' चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय तो दीपिका पदुकोणबरोबर 'पठाण 2' या चित्रपटामध्ये झळकणार आहे.
हेही वाचा :