ETV Bharat / state

अजित पवारांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध : शरद पवार गटातील माजी मंत्र्यांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण - BALASAHEB PATIL ON AJIT PAWAR

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी बंड केल्यानंतर अनेक नेते त्यांच्यासोबत आले. मात्र शरद पवारांच्या पक्षात असलेले नेतेही अजित पवारांशी जिव्हाळ्याचे नाते असल्याचं सांगत आहेत.

Balasaheb Patil On Ajit Pawar
संपादित छायाचित्र (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2025, 1:28 PM IST

सातारा : कराड उत्तरमधील मतदारांनी मला 25 वर्षे विधिमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. या काळात काँग्रेस, एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, या सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेऊन काम करण्याची माझी भूमिका राहिली आहे, असं वक्तव्य माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं. या वक्तव्यातून त्यांनी आपल्या विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. परंतु, शरद पवार गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार का, या चर्चेला सुद्धा अधिकच जोर आला आहे.

'कभी नाव गाडी पे तो कभी गाडी नाव पे' : राज्यातील सर्वच पक्षांशी, नेत्यांशी व्यक्तिशः माझे चांगल्या प्रकारचे संबंध आहेत, असं माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं. "यशवंतरावांचा विचार सोडायचा नाही, ही आपली भूमिका आहे. आज आपल्याला काळ उलटा लागला असला तरी 'कभी नाव गाडी पे तो कभी गाडी नाव पे', असं होत राहतं. विधानसभेचा निकाल आपण स्वीकारला आहे. एवढं बहुमत कसं? बहुमत मिळूनही जल्लोष का नाही? अशी चर्चाही झाली. परंतु, निकालादिवशी मी अर्ध्या तासातच जनमताचा कौल स्वीकारला होता," असंही त्यांनी सांगितलं.

'सहकारा'वर विश्वास ठेऊन 'सहकार्य' करा : "आपण नियमानं काम करतो. त्यामुळं शासकीय पातळीवर काही अडचणी येतील, अशी परिस्थिती नाही," असंही माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलं. तसंच "सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेऊन काम करण्याची आपली भूमिका राहिलेली आहे. कारखान्याच्या माध्यमातून पुढील पन्नास वर्षांत सर्वांच्या जीवनात अर्थिक परिवर्तन घडेल. आपण सर्वांनी सहकारावर विश्वास ठेऊन सहकार्य करावं," असं आवाहन त्यांनी केलं.

शेअर्सची साखर गाव पोहोच मोफत देणार : गेली पन्नास वर्षे सभासदांनी कारखान्याच्या प्रगतीमध्ये सहकार्य केलंय. त्यांना काही तरी दिलं पाहिजे, असं आम्हाला वाटत होतं. म्हणून 1 एप्रिल 2027 पासून सभासदांना शेअर्सची साखर मोफत गाव पोहोच देण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतला असल्याचं माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केलं. तसेच आधी 3200 रूपये पहिली उचल जाहीर केली होती. मात्र, त्यामध्ये 4 रूपयांची वाढ करून 3204 रूपये पहिली उचल सभासदांच्या खात्यावर वर्ग केली असल्याचं त्यांनी सांगितलं. संचालक मंडळ, नेते आणि कार्यकर्ते तुमच्या सेवेशी बांधिल आहेत, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

खोट्या नरेटीव्हला बळी पडू नका : "हल्ली राजकारणात खोटं नरेटीव्ह पसरवण्याची नवीन भानगड सुरू झाली आहे. ऊस तोडणी टोळ्यांच्या बाबतीत सभासदांमध्ये खोटं नरेटीव्ह पसरवलं जात आहे. त्या अपप्रचाराच्या मुळाशी आपण जायला पाहिजे. कुणाचं तरी भलं व्हावं, कुणाला तरी ऊस मिळावा, यासाठी असं बोललं जातंय. त्या अपप्रचाराला बळी पडू नका. राजकीय नरेटीव्हला प्रत्त्युत्तर द्यायला मी सक्षम आहे," असा इशाराही माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी विरोधकांना दिला.

हेही वाचा :

  1. मनाजोगं खातं न मिळाल्यानं राज्यातील काही मंत्री नाखूष, अजित पवार यांची स्पष्टोक्ती
  2. छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत अजित पवार म्हणाले, "आमच्या पार्टीचा अंतर्गत विषय, तो आमचा आम्ही सोडवू"
  3. भुजबळांची नाराजी अन् अजित पवारांचं मौन; नेमकं चाललंय काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.