ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का: माजी महापौर दाम्पत्य एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत, आगामी निवडणुकीचं उबाठापुढं आव्हान - UBT EX MAYOR COUPLE JOIN SHIV SENA

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला संभाजीनगर शहरात मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला.

UBT EX Mayor Couple Join Shiv Sena
नंदकुमार घोडेले (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2025, 7:11 AM IST

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत उबाठाचा बालेकिल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अनेक स्थानिक नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाणं पसंत केलं. त्याचा प्रत्यय शुक्रवारी आला, नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले या महापौर दाम्पत्यानं मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. नंदकुमार घोडेले हे उबाठा पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले शिवसेनेत : शहरातील शिवसेनेच्या मुख्य फळीतील एकनिष्ठ नेत्यांमध्ये असलेले नंदकुमार घोडेले आणि त्यांच्या पत्नी अनिता घोडेले यांनी शुक्रवारी सायंकाळी शिवसेनेत प्रवेश केला. उबाठा नेते चंद्रकांत खैरे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख प्रचलित आहे. पती - पत्नी दोघांनीही काही वर्षांपूर्वी शहराचं महापौरपद भूषवलं आहे. अनिता घोडेले यांनी 2010 ते 2012 तर नंदकुमार घोडेले 2017 ते 2020 या काळात अडीच - अडीच वर्ष महापौर पदी होते. तर शहरातील प्रत्येक निवडणुकीत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत नंदू भाऊ म्हणून प्रचलित असलेले घोडेले यांचा सहभाग असायचा. पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या या नेत्यानं अचानक सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून मुंबईत उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. अचानक झालेल्या पक्षांतरामुळे उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि मतदारांना मात्र आश्चर्याचा धक्का बसलाय.

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षप्रवेश : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या हक्काच्या जिल्ह्यातील मतदारांनी पाठ फिरवली. मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं एकनाथ शिंदे यांनी तयारी सुरू केली. त्याचाच प्रत्यय नंदकुमार घोडेले यांच्या पक्ष प्रवेशानं आला. येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. याआधी अनेक नगरसेवकांना जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी शिवसेनेत घेतलं आहे. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुका ठाकरे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहेत हे नक्की.

हेही वाचा :

  1. ठाकरेंच्या सेनेचे मिशन मुंबई महापालिका, काय आहेत आव्हाने अन् बलस्थाने?
  2. "ज्यांना कारागृहात टाकायला निघाले आता त्यांची गळाभेट कशासाठी ?" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
  3. उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.