मुंबई : मंत्रालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून गाव-खेड्यातून लोक आपल्या कामासाठी येतात. मात्र गावाकडून मंत्रालयात कित्येक खेटे मारुनही अनेकांची कामे होत नाहीत. दरम्यान, मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी दुपारी दोननंतर लांबच लांब रांगा लागतात. यावर आता तोडगा काढण्यात आला आहे.
एफआरएस प्रणाली अमलात आणणार : मंत्रालयात खिडकीतून पास काढून मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी एक ते दीड किलोमीटर रांग असते. मात्र आता या रांगेपासून लोकांची मुक्तता होणार आहे. या रांगेमुळं सुरक्षा यंत्रणेवरती मोठ्या प्रमाणात ताण यायचा. तसंच मंत्रालयात गर्दी मोठी असते. यावर तोडगा म्हणून आता मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी अद्यावत 'एफआरएस प्रणाली' बसवण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे तुम्हाला थेट मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. ही एफआरएस प्रणाली नेमकी आहे कशी? याचा मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरून आढावा आमच्या प्रतिनिधींंनी घेतलाय.
कशी आहे एफआरएस प्रणाली? : तुम्हाला मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर स्वतः पास काढावा लागणार किंवा ते मंत्रालयाच्या गेटवर सुद्धा पास काढू शकतात. त्या पासने तुम्ही इमारतीच्या आत प्रवेश करताना पास एफआरएसमध्ये स्कॅन झाल्याशिवाय तुम्हाला पुढे प्रवेश मिळणार नाही. तसंच तुम्हाला ज्या विभागात जायचं आहे. तिथेच प्रवेश मिळणार आहे जर तुम्ही अन्य ठिकाणी गेला तर त्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारण्याचे किंवा आत्महत्या केल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही आत्महत्या किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं नाव ब्लॅाक लिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे.
रांगेपासून मुक्तता मिळणार : मंत्रालयात पूर्वी खिडकीवर पास मिळविण्यासाठी दुपारनंतर एक ते दीड किलोमीटर पर्यंत रांगा लागायच्या. यामुळं सुरक्षा यंत्रणेवर ताण पडायचा. परंतु आता एफआरएस प्रणालीद्वारे वेळ वाचणार आहे आणि गर्दीही कमी होणार आहे. तसंच सुरक्षेवरती जो पूर्वी ताण पडायचा. तो आता ताण कमी होणार आहे. दरम्यान, "ही प्रणाली 1 जानेवारी 2025 पासून सुरु होणार होती. परंतु कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा शंभर टक्के डेटा आमच्याकडं प्राप्त झाला नसल्यामुळं एफआरएस प्रणाली 15 जानेवारीनंतर सुरू होईल," असं प्रणाली हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- निवडणुकीची घाई..! दररोज शंभरहून जास्त शासन निर्णयांचा सपाटा, आचारसंहितेपूर्वी मंत्रालयात गजबजाट - Government Decisions
- मंत्रालयात तोडफोड करणारी महिला मानसिक रुग्ण; पोलिसांची माहिती - Devendra Fadnavis Office Attack
- मंत्रालयात आदिवासी आमदारांचं आंदोलन: नरहरी झिरवाळांनी मारली जाळीवर उडी - Narhari Zirwal Protest