मुंबई : जगानं 2024ला निरोप दिला असून नवीन वर्षाचे स्वागत खूप उत्साहानं केलं आहे. आता अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यामातून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. याशिवाय अनेक स्टार्सने देखील आपल्या चाहत्यांसाठी काही सुंदर पोस्ट शेअर केल्या आहेत. चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी सुंदर संदेश आणि वैयक्तिक क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 2025 मध्ये मोठ्या उत्साहानं आणि कृतज्ञतेनं पाऊल ठेवत असताना बॉलिवूड स्टार्सनं काही सुंदर पोस्ट आणि फोटो शेअर करून चाहत्यांना एक भेट दिली आहे. सुनील शेट्टीपासून ते अमिताभ बच्चनपर्यंतच्या स्टार्सनं सुंदर संदेश दिले चाहत्यांना दिले आहेत.
अमिताभ बच्चन यांची पोस्ट : अमिताभ बच्चन यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत लिहिलं, 'नवीन वर्ष, नवीन आनंद, जीवनाची नवीन भरभराट; नवीन इच्छा, नवीन मार्ग, जीवनाचा नवीन प्रवाह.' आता 'बिग बी'च्या या पोस्टवर अनेक चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. याशिवाय दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, '2025 !!! जिंदाबाद.' आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, 'चालत आहे 365 दिवसांसाठी.' आता अमिताभ बच्चन यांची पोस्ट सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.
कार्तिक आर्यनची पोस्ट : कार्तिक आर्यनसाठी, 2024 हे वर्ष बदलणारे होते, 'चंदू चॅम्पियन' आणि 'भूल भुलैया 3'मधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनं त्यानं बॉलिवूडमध्ये आपलं स्थान स्थिर केलंय. 2024च्या शेवटच्या दिवशी, कार्तिकनं इंस्टाग्रामवर एक भावनिक नोट शेअर केली आहे. त्यानं गेलेल्या वर्षाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. या पोस्टवर त्यानं लिहिलं, 'ऐतिहासिक 2024साठी धन्यवाद! एक वर्ष ज्यानं माझे आयुष्य बदलून टाकलं. नेहमी आठवण राहील!! कृतज्ञता.' याशिवाय कार्तिकनं त्याच्या दोन चित्रपटांची पोस्टर देखील या पोस्टला जोडली आहेत. 'चंदू चॅम्पियन' चित्रपटामध्ये कार्तिक पॅरालिम्पिक चॅम्पियनच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटासाठी त्याचे खूप कौतुक करण्यात आले होते. याशिवाय 'भूल भुलैया 3'मध्ये तो 'रूह बाबा'च्या भूमिकेत दिसला होता. 'भूल भुलैया 3' हा चित्रपट कार्तिकच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला.
नयनताराची पोस्ट : साऊथ अभिनेत्री नयनतारानं 2025ची सुरुवात दुबईमध्ये पती विघ्नेश शिवन आणि जवळचे मित्र आर माधवन आणि सरिता बिर्जे यांच्याबरोबर केली. तिनं न्यू ईयर साजरा करत असतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नयनतारानं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'खूप चांगला वेळ मॅडी सर आणि सरिता मॅडम. सुंदर रात्र.'
अनन्या पांडेची पोस्ट : अनन्या पांडेनं 2025साठी एक इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली, जी पुढील वर्षासाठी सकारात्मक उर्जा पसरवत आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, '2025ची सुरुवात फक्त प्रेमानं करत आहे!!! चला उर्वरित वर्षासाठी टोन सेट करूया.' आता तिच्या या पोस्टवर अनेकजण तिला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत.
सुनील शेट्टी नवीन वर्षाची पोस्ट : अभिनेता सुनील शेट्टीनं एक प्रेरणादायी संदेश शेअर केला आहे. त्यानं त्याच्या पोस्टवर लिहिलं '2025 - नवीन सुरुवात, नवीन मानसिकता, नवीन फोकस... कठोर परिश्रम करा, मोठी स्वप्ने पाहा आणि गोष्टी घडवा.' ही पोस्ट सुनीलची खूप व्हायरल झाली आहे.
रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया : रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा यांनी त्यांच्या मुलांसह सुंदर फोटो शेअर केले आहेत. याशिवाय रितेशनं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आमच्या कुटुंबाकडून तुम्हाला.... नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2025 !!!!" दुसरीकडे, जेनेलियानं इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये लिहिलं, '2024चा शेवटचा दिवस आणि मला असं वाटतं की हे वर्ष नुकतेच निघून गेलं... 2025 ची वेळ. गेल्या वर्षाबद्दल कृतज्ञता आणि नवीनसाठी सकारात्मक उर्जा, 2025 आले आहेत.' याशिवाय करिश्मा कपूरनं 2024 बद्दल कृतज्ञ व्यक्त करत नोटसह 2025 चं स्वागत केलंय. तिनं आपल्या पोस्टवर लिहिलं, 'कृतज्ञतेनं वर्षाचा शेवट, 2024 कृतज्ञ.' याशिवाय कजोल, रणबीर कपूर, करिना कपूर यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तसेच अनेक चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून 2025 सुरू झाल्याचा आपला आनंद व्यक्त करत आहेत.