जालना Batter Death on Ground : जालना शहरात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळताना एका 32 वर्षीय तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्यानं मैदानावरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. विजय पटेल असं मयत तरुणाचं नाव असून तो क्रिकेट स्पर्धेत भाग घेण्यासाठी आला होता. या घटनेमुळं मात्र क्रिकेटप्रमींममध्ये खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं : ख्रिसमस निमित्त जालन्यातील 'फ्रेजर बॉईज' या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत सामना सुरु होता. या सामन्यादरम्यान बॅटिंग करताना विजयनं फुल टॉस बॉल आला तेव्हा त्यानं उत्तुंग षटकार मारला. यानंतर त्यानं आपल्या सहकारी फलंदाजासोबत चर्चाही केली. मात्र नंतर विजयला लगेचच चक्कर आल्यानं तो खाली पडला. त्याला पडताना पाहून इतर खेळाडू धावत आले आणि त्याला रुग्णालयात घेऊन गेले, तिथं डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. अचानक झालेल्या या दुर्घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे.
मुंबईचा होता खेळाडू : जालन्यातील फ्रेजर बॉईज शाळेच्या मैदानावर ख्रिसमसच्या सणा निमित्तानं ख्रिचन बॉईज संघानं आयोजित केलेल्या या स्पर्धेत राज्यातून अनेक संघांनी घेतला होता. विजय पटेल हा मुंबईतील नालासोपारा भागातील क्रिकेट संघाचा सदस्य होता.
क्रिकेटप्रेमींमध्ये खळबळ : या घटनेची माहिती मिळताच क्रिकेटप्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची बातमी सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून विजय पटेल यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या क्रिकेटपटूचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यानं क्रिकेटप्रेमींसोबतच घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित सर्व तरुणांनाही मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा :
- कॅरेबियन गोलंदाजानं एका चेंडूत दिल्या 15 धावा, ओव्हरमध्ये टाकले 12 बॉल; पाहा व्हिडिओ
- 'बॉक्सिंग-डे' कसोटीचा 'मॅन ऑफ द मॅच' कर्णधार संघाबाहेर; नव्या कर्णधारासह कांगारुंनी केला संघ जाहीर
- 'साहेबां'चा संघ नव्या वर्षात पहिल्यांदा भारतात येणार; किधी आणि कुठं होणार मॅचेस? वाचा सविस्तर
- “मी मैदानावर लवकरच ‘या’ भूमिकेत परतणार…”, विनोद कांबळी याची ईटीव्ही भारतला एक्स्लुसिव्ह मुलाखत