ढाका 15 Runs in One Ball : क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच काही ना काही करिष्मा घडतो. एक फलंदाज एका चेंडूवर किती धावा करू शकतो असे जर तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर बहुधा सहा धावा असं असेल. तुमचं उत्तर काही वेगळं असण्याची शक्यता आहे, पण 15 धावा होणार नाहीत हे मात्र नक्की. पण जर एखाद्या गोलंदाजानं फक्त एक कायदेशीर चेंडू टाकला आणि त्यात 15 धावा झाल्या असतील तर? विशेष म्हणजे या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याला विकेटही मिळाली. हे सर्व बांगलादेश प्रीमियर लीगदरम्यान घडलं आणि ओशन थॉमस त्याचा साक्षीदार ठरला.
🚨 Academy Alert
— Dinda Academy (@academy_dinda) December 31, 2024
Oshane Thomas conceded 15 Runs in just 1 ball in BPL 🤯 pic.twitter.com/GYwb17GdQo
बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये घडला विक्रम : सध्या बांगलादेश प्रीमियर लीग सुरु झाली आहे. आज त्या सामन्यात खुलना टायगर्स आणि चितगाव किंग्ज यांच्यात सामना झाला. यात खुलना टायगर्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 203 धावा केल्या. म्हणजेच आता चितगाव किंग्जला विजयासाठी 204 धावा करायच्या होत्या. यानंतर चितगाव किंग्जचा संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा ओशान थॉमसनं पहिला चेंडू टाकला. जो वेस्ट इंडिजसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. त्यानं टाकलेला पहिला चेंडू नो बॉल होता. यानंतर दुसऱ्या चेंडूवर एकही धाव झाली नाही. म्हणजे दोन चेंडू टाकल्यावरही एकच कायदेशीर चेंडू होता. तिसरा चेंडूही नो बॉल ठरला आणि फलंदाज नईम इस्मालनं त्यावर षटकार ठोकला. जरी आतापर्यंत फक्त एक चेंडू टाकला होता. चौथा आणि पाचवा चेंडू ओशान थॉमसनं वाइड टाकला. सहावा चेंडूही नो बॉल होता आणि त्यावर फलंदाजानं चौकार मारला, अशा प्रकारे एका कायदेशीर चेंडूत 15 धावा झाल्या.
15 runs off 1 ball! 😵💫
— FanCode (@FanCode) December 31, 2024
Talk about an eventful way to start the innings! #BPLonFanCode pic.twitter.com/VWFfrHhGil
6 चेंडू टाकूनही ओव्हर पूर्ण झाली नाही : गोलंदाजानं 6 चेंडू टाकले होते, पण प्रत्यक्षात तो फक्त एकच चेंडू होता. सातवा चेंडू कायदेशीर होता, पण त्यावर एकही धाव झाली नाही. म्हणजेच चितगाव किंग्ज संघानं एकच चेंडू टाकला तोपर्यंत संघाच्या 15 धावा झाल्या होत्या. यानंतर ओशन थॉमसनं दुसरा नो बॉल टाकला आणि त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर एक विकेटही घेतली. ओशान थॉमसनं या षटकात सहा लीगल चेंडू टाकण्यासाठी 12 चेंडू टाकले आणि या षटकात एकूण 18 धावा झाल्या आणि एक विकेटही पडली. याचा अर्थ हा एक अतिशय मनोरंजक षटक होता. ज्याची सध्या चर्चा होत आहे.
Oshane Thomas conceded 15 Runs in just 1 ball in BPL 🤯 pic.twitter.com/5gpMG4jSS5
— Dinesh Verma (@DineshVerm1047) December 31, 2024
हेही वाचा :