हैदराबाद : किआ मोटर्स इंडियानं अलीकडेच सायरोस एसयूव्ही लाँच केलीय. आता कंपनी सेल्टोसचं हायब्रिड व्हर्जन लाँच करण्याची तयारी करत आहे. ही हायब्रिड कार अनेक वेळा चाचणी वेळी दिसलीय. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये सेल्टोसची नवीन आवृत्ती लाँच करू शकते. या कारचा लूक मागील मॉडेलपेक्षा वेगळा असेल. तिच्या शैली आणि डिझाइनमध्येही मोठे बदल होऊ शकतात.
किआ सेल्टोस हायब्रिडमध्ये काय असेल खास? : यात चौकोनी आकाराचे हेडलॅम्प आणि एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स असतील. कंपनीनं अद्याप नवीन सेल्टोसच्या इंजिनबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु त्यात टर्बो पेट्रोल, टर्बो डिझेल आणि पेट्रोल हायब्रिड असे विविध इंधन पर्याय असतील.
कधी लाँच होणार : किआ सेल्टोसच्या दुसऱ्या आवृतीसोबत भारतीय बाजारात हायब्रिड इंजिन देखील लाँच केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, किआ इंडिया 2025 च्या मध्यात नवीन सेल्टोसची विक्री सुरू करू शकते. किआ सेल्टोसच्या नविन आवृत्तीपूर्वी किया भारतात सुमारे 3 नवीन मॉडेल्स लाँच करणार आहे. यामध्ये किआमध्ये एक नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही, कॅरेन्स फेसलिफ्ट आणि कॅरेन्स ईव्ही समाविष्ट आहे. अलीकडेच, कंपनीनं किआ सायरोस लाँच केलीय. कंपनीनं या कारमध्ये बरेच बदल केले आहेत. ही कार अधिक प्रशस्त करण्यात आली आहे. त्यात रिक्लाइनिंग रिअर सीट देखील आहे.
किआ सायरोस एसयूव्ही वैशिष्ट्ये : किआ सायरोस एसयूव्हीमध्ये नवीन वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये एलईडी लाईट्स, एलईडी डीआरएल, पॅनोरॅमिक सनरूफ, एलईडी टेल लाईट्स, अँबियंट लाईट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, टेरेन आणि ड्रायव्हिंग मोड्स, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जर, हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम, लेव्हल-2 एडीएएस, सहा एअरबॅग्ज यांचा समावेश आहे. या कारमध्ये एबीएस, ईबीडी आणि आयसोफिक्स चाइल्ड अँकरेज देखील प्रदान केलं आहे.
इंजिन : किआ सायरोसच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचं झालं तर, त्यात दोन इंजिन पर्याय आहेत. यात 1.0 -लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन मिळू शकते, जे 118 बीएचपी पॉवर आणि 172 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करेल. या कारचं इंजिन 6-स्पीड मॅन्युअल किंवा 7-स्पीड डीसीटी गिअरबॉक्ससह येऊ शकतं. तसंच, त्याचं 1.5-लिटर डिझेल इंजिन 114 बीएचपी पॉवर आणि 250 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करेल. 6-स्पीड मॅन्युअल किंवा टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह कोणते इंजिन उपलब्ध असेल? ही एसयूव्ही फ्रंट व्हील ड्राइव्ह आहे.
'हे' वाचलंत का :