बुलावायो PAK Beat ZIM by 10 Wickets : पाकिस्तान क्रिकेट संघानं दुसऱ्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेचा 10 गडी राखून दारुण पराभव केला. या सामन्यात पाकिस्तान संघाची प्रत्येक चाल बरोबर होती. गोलंदाज आणि फलंदाजांनी संघासाठी अप्रतिम कामगिरी केली. झिम्बाब्वेनं पाकिस्तानला विजयासाठी 146 धावांचं लक्ष्य दिलं होतं, जे सॅम अयुबच्या झंझावाती शतकामुळं पाकिस्ताननं सहज गाठलं. अयुबशिवाय अब्दुल्ला शफीकनं 32 धावांचं योगदान दिलं.
अवघ्या 53 चेंडूत केलं शतक :सॅम अयुबनं डावाच्या सुरुवातीपासूनच लयीत दिसला आणि झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर त्यानं आक्रमण कायम ठेवलं. त्याच्यासमोर प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज टिकू शकले नाहीत. त्यानं झपाट्यानं धावा केल्या आणि अवघ्या 53 चेंडूत शतक पूर्ण करुन आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी सर्वात जलद शतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या पुढं फक्त शाहिद आफ्रिदी आहे.
पाकिस्तानसाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारे फलंदाज :
- शाहिद आफ्रिदी - 37 चेंडू, विरुद्ध श्रीलंका
- शाहिद आफ्रिदी - 45 चेंडू, विरुद्ध भारत
- शाहिद आफ्रिदी - 53 चेंडू, विरुद्ध बांगलादेश
- सॅम अयुब- 53 चेंडू, विरुद्ध झिम्बाब्वे
- शर्जील खान - 61 चेंडू, विरुद्ध आयर्लंड