ETV Bharat / sports

मूर्ती लहान पण कीर्ती महान..! 6 वर्षीय जलतरणपटू रेयांशनं केला महापराक्रम; थेट 'इंडिया बुक ऑफ रेकाँर्ड'मध्ये नाव - REYANSH KHAMKAR RECORD

ठाण्यातील 6 वर्षीय जलतरणपटू रेयांश खामकरनं 15 किलोमीटरचं आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासात पोहून पार करत नवा विक्रम केला आहे.

Youngest Swimmer
रेयांश खामकर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 8, 2025, 5:18 PM IST

ठाणे Youngest Swimmer : ठाण्यातील स्टारफिश स्पोटर्स फाऊंडेशनचा सर्वात लहान असलेला 6 वर्षीय जलतरणपटू रेयांश खामकरनं विजयदुर्ग येथील समुद्रात मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे 15 किलोमीटरचं आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासात पोहून पार केलं आहे. यासह 15 किमीचं अंतर पार करणारा रेयांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याची दखल इंडिया बुक रेकाँर्डनं घेतली आहे. ठाणेकर जलतरणपटू रेयांशची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली असून याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

गेल्या वर्षभरात मिळवली 13 पदकं : रेयांश खामकर हा स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडून घेत असून तो ठाणे महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरणतलाव इथं दररोज सराव करत आहे. रेयांश हा ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असून त्याच्या या विक्रमाबद्दल त्याचं शाळेनंही कौतुक केलं आहे. गेल्या वर्षभरात विविध स्पर्धामध्ये रेयांशनं 13 पदकं प्राप्त केली असून यात 5 सुवर्ण, 5 रौप्य व 3 कांस्य पदकांचा समावेश आहे.

रेयांशनं केला महापराक्रम (ETV Bharat Reporter)

रेयांशनं केला नवा विक्रम : विजयदुर्ग येथील सागरी जलतरण ही रेयांशची पहिलीच सागरी जलतरण स्पर्धा होती. या स्पर्धेत सहभागी होणारा हा लहान जलतरणपटू असल्यानं सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. परंतु हे अंतर अवघ्या तीन तासात पार करुन रेयांशनं एक नवा विक्रम केला. त्यानं केलेल्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेवून त्याचा सन्मान केला आहे. सन 2024 मध्ये रेयांश खामकर हा सतत विविध स्पर्धांमध्ये सातत्यानं सहभाग घेत होता. 2 जून 2024 रोजी ठाणे इथं झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत 25 मीटर बटरफ्लाय विथ फिन्स स्पर्धेत त्यानं सुवर्णपदक तर 50 मीटर फ्रीस्टाईल विथ फिन्समध्ये कांस्य पदक प्राप्त केलं. 6 जुलै 2024 रोजी कोल्हापूर इथं झालेल्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या त्रिराज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत त्यानं 50 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले.

आतापर्यंत कुठं-कुठं मिळवली पदकं : 7 ते 18 ऑगस्ट 2024 रोजी बँकॉक, थायलंड इथं झालेल्या आशियाई ओपन स्कूल्स स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये रेयांशनं उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तो महाराष्ट्र एक्वाटिक असोसिएशननं निवडलेल्या 15 जलतरणपटूंपैकी एक होता ज्यानं आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलं होतं. 6 वर्षांखालील मुलांच्या गटात 25 मीटर फ्रीस्टाइल किकबोर्डमध्ये रौप्य पदक, 25 मीटर फ्री स्टाईलमध्ये कांस्य पदक, 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कांस्य पदक, 200 मीटर फ्री स्टाईल रिलेमध्ये रौप्य पदक त्यानं प्राप्त केलं. तसंच 15 सप्टेंबर 2024 रोजी अंडरवॉटर स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र द्वारा आयोजित केलेल्या चौथ्या महाराष्ट्र राज्य फिन स्विमिंग स्पर्धेत रेयांशनं 50 मीटर मोनोफिन सरफेस स्विमिंगमध्ये सुवर्णपदक, 100 मीटर बायफिन मिश्र रिलेमध्ये सुवर्णपदक, 50 मीटर बायफिन स्विमिंगमध्ये रौप्यपदक पटकाविले. सदरची स्पर्धा ही 8 वर्षे व त्यावरील वयोटासाठी होती, परंतु रेयांशनं आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत केलेली कामगिरी लक्षात घेवून 9 वर्षे या वरिष्ठ वयोगटात सहभागी होण्यासाठी त्याला विशेष प्रवेश देण्यात आला होता.

अनेकांकडून कौतुक : यासह 9 ऑक्टोबर 2024 रोजी विबग्योर हायस्कूल खारघर इथं झालेल्या 16व्या व्हिवा इंटरस्कूल जलतरण स्पर्धेत रेयांशनं 20 मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक आणि 20 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य पदक प्राप्त केलं आहे. सर्वात लहान रेयांश खामकर या ठाणेकर जलतरणपटूंचं सर्वत्र कौतुक होत असून ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मीनल पालांडे यांनी देखील त्याचं कौतुक करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा :

  1. 126/5 ते 142/10... पाहुण्यांनी पुन्हा गमावली हातातली मॅच; 'कीवीं'नी जिंकली मालिका
  2. 'कीवीं'विरुद्ध लंकन गोलंदाजाची पहिलीच हॅट्ट्रिक... 4 विकेट घेत केले अनेक रेकॉर्ड; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.