रावळपिंडी Unique Record in ODI : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, न्यूझीलंड क्रिकेट संघानं शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी सुरुवातीचे दोन्ही गट सामने जिंकून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. किवी संघानं 24 फेब्रुवारी रोजी रावळपिंडीच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध ग्रुप सामना खेळला. ज्यात त्यांनी 46.1 षटकांत 5 गडी गमावून 237 धावांचं लक्ष्य गाठलं. न्यूझीलंड संघाकडून रचिन रवींद्रनं शतक झळकावलं, तर टॉम लॅथमनंही 55 धावांची शानदार खेळी केली, ज्याच्या आधारे त्यानं वनडे क्रिकेटमध्ये यापूर्वी कोणत्याही फलंदाजाला करता न आलेला अनोखा विक्रम आपल्या नावावर केला.
Tom Latham last 6 ODI innings
— All Cricket Records (@Cric_records45) February 25, 2025
0 (4) vs 🇱🇰, Auckland, 2025
0 (3) vs 🇵🇰, Lahore, 2025
0 (1) vs 🇿🇦, Lahore, 2025
56 (64) vs 🇵🇰, Karachi, 2025
118* (104) vs 🇵🇰, Karachi, 2025
55 (76) vs 🇧🇩, Rawalpindi, 2025* pic.twitter.com/FQuoWoepgs
कोणता केला विक्रम : वास्तविक सलग तीन डावात शून्यावर बाद झाल्यानंतर टॉम लॅथमनं वनडे क्रिकेटमध्ये सलग तीन डावात पन्नासपेक्षा जास्त धावा करणारा पहिलाच खेळाडू बनला आहे. जर आपण लॅथमच्या शेवटच्या सहा वनडे सामन्यांकडे पाहिलं तर तो श्रीलंका, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग तीन सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला होता. मात्र यानंतर, त्यानं पाकिस्तानविरुद्ध सलग दोन सामन्यांमध्ये 56 आणि 118 धावांच्या नाबाद खेळी केल्या आणि आता बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 55 धावांची खेळी खेळून, तो वनडे सामन्यात हा अद्भुत विक्रम करणारा पहिलाच खेळाडू बनला आहे.
Tom Latham follows his hat-trick of ducks with three 50+ scores on the bounce - a first such instance in men's ODIs 👏 #NZvBAN pic.twitter.com/qVKpRw4wde
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 25, 2025
न्यूझीलंड संघाचा पुढील सामना भारताविरुद्ध : न्यूझीलंड संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं असले तरी, गट अ मधील त्यांचा शेवटचा सामना अद्याप खेळलेला नाही, जो 2 मार्च रोजी दुबईच्या मैदानावर भारताविरुद्ध असेल. या सामन्याच्या निकालावरुन भारत किंवा न्यूझीलंड यापैकी कोणता संघ 'अ' गटात अव्वल स्थानावर राहील आणि कोणता संघ दुसऱ्या स्थानावर राहील हे ठरेल कारण दोन्ही संघांनी आधीच उपांत्य फेरीसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे.
50 partnership up between Rachin Ravindra (67*) and Tom Latham (16*). The pair building again after Devon Conway fell in the 16th over for 30. LIVE scoring | https://t.co/oRGEg8e5IC 📲 #ChampionsTrophy #BANvNZ pic.twitter.com/7h9nY80BRv
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 24, 2025
बांगलादेशच्या पराभवानं पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात : न्यूझीलंड आणि बांगलादेशसह पाकिस्तानसाठीही हा सामना तितकाच महत्वपूर्ण होता कारण स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर त्यांचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. मात्र आजच्या सामन्यात बांगलादेशनं विजय मिळवला असता, तर त्यांचं स्पर्धेतील आव्हान काहीअंशी कायम राहिलं असतं. मात्र न्यूझीलंडनं बांगलादेशचा पराभव केल्यानं बांगलादेशसह पाकिस्तानचही आव्हान संपुष्टात आलं असून त्याचा फायदा भारताला झाला आहे. आता न्यूझीलंड सह भारतही ग्रुप अ मधून सेमी फायनलसाठी पात्र झाला आहे.
हेही वाचा :