मुंबई - 26 फेब्रुवारी रोजी देशभर महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. प्रत्येक राज्यातील प्रसिद्ध शिवंमंदिरं, देशभरातील 12 ज्योतिर्लिंग देवस्थानं इथपासून ते गावोगावी असलेली महादेवाची मंदिरं भक्तांच्या गर्दीनं भरुन वाहतील. भगवान शंकराचे भक्त अगदी सर्वच क्षेत्रात आहेत, त्यामुळं बॉलिवूड त्याला अपवाद कसं असेल. हिंदी चित्रपटसृष्टील अनेक अभिनेता आणि अभिनेत्री शिवभक्त आहेत. अनेकदा त्यांनी शिवमंदिरांना भेटी देऊन आपली भक्ती दाखवून दिली आहे. अनेकदा त्यांचे शिवपूजन करणारे फोटो सोशल मीडियावर झळकत असतात. असा काही बॉलिवूड सेलेब्रिटींच्यावर एक नजर टाकूयात.
1. सारा अली खान
अभिनेत्री सारा अली खान स्वतःला शिवभक्त समजते. अनेकदा ती महाकाल आणि केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेते आणि त्याचे फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अलिकडेच सारानं अमरनाथलाही जाऊन दर्शन घेतलं होतं.
2. कंगना राणौत
बॉलिवूडची क्विन कंगना राणौत महादेवाची भक्त आहे. तिनं आपल्या घरातील मंदिरातही शिवलिंगाची स्थापना केली आहे, ज्याची एक झलक तिने तिच्या इंस्टाग्रामवर देखील शेअर केली आहे. याशिवाय, कंगना अनेकदा उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात भगवान शिवाच्या दर्शनासाठी जात असते. ती दरवर्षी महाशिवरात्रीचा सण भक्तीभावानं साजरा करत असते.
3. रवीना टंडन
भारतात 12 पवित्र ज्येतिर्लिंग असल्याचं मानलं जातं. या सर्व देवस्थानांना भेटी देऊन महादेवाची पूजा करणारी अभिनेत्री रवीना टंडन मोठी शिवभक्त आहे. 'केदारनाथ ते रामेश्वरम' पर्यंत सर्व ज्योतिर्लिंगांचे दर्शन तिनं घेतलंय.
4. संजय दत्त
बॉलिवूड स्टार संजय दत्तनं हिंदी शिवाय दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचे चाहते संपूर्ण देशभर खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. संजय दत्तचे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी होत असते. बॉलिवूडमध्ये 'बाबा' या नावानं ओळखला जाणारा संजूबाबा भोलेनाथाचा मोठा भक्त आहे. त्यानं आपल्या हातावर भगवान शिवाचा टॅटूही गोंदवला आहे.
5. अजय देवगण
बॉलिवूडचा 'सिंघम' या नावानं प्रसिद्ध असलेला अजय देवगण देखील भगवान महादेवाचा एक महान भक्त आहे. त्याच्या छातीवर शिवजींचा टॅटू आहे आणि त्याखाली 'ओम नमः शिवाय'असंही लिहिलेलं आहे. त्यांनी 'शिवाय' हा चित्रपट बनवला आहे आणि त्यात त्यांनी मुख्य भूमिका देखील साकारली आहे.
6. कुणाल खेमू
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडलेला अभिनेता कुणाल खेम हादेखील भगवान महादेवाचा मोठा भक्त आहे. कुणालनं त्याच्या पाठीवर 'ओम नमः शिवाय' लिहिलेला टॅटू आहे.
7. सुधांशू पांडे
'अनुपमा' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता सुधांशू पांडे हा महादेवाचा एक महान भक्त आहे. त्यानं डाव्या हातावर त्रिशूळ आणि डमरू असलेली भगवान शिवाची मूर्ती बनवली आहे. सुधांशू अनेकदा महाकाल आणि इतर शिव मंदिरांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
8. करणवीर बोहरा
कसौटी जिंदगी की, दिल से दी दुआ...सौभाग्यवती भव, शरारत, जस्ट मोहब्बत, नागिन 2, कुबूल है यासारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला करणवीर बोहरा भगवान शिवावर खूप श्रद्धा ठेवणारा अभिनेता आहे. त्यानं शिव तांडव नृत्यही शिकलंय. तो अनेकदा शिवपूजेचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असतो.
9. अर्जुन बिजलानी
लेफ्ट राइट लेफ्ट, मिले जब हम तुम, मेरी आशिकी तुम से ही, नागिन आणि इश्क में मरजावां यासारख्या गाजलेल्या मालिकांमधून झळकलेला अर्जुन बिजलानी शिवभक्त आहे. तो अनेकदा हरिद्वार आणि शिवाशी संबंधित ठिकाणांना भेटी देत असतो.
10. मौनी रॉय
'देवों के देव महादेव' या मालिकेमध्ये सती, दक्षिणायनी आणि महादेवीची भूमिका साकरणारी मौनी रॉय खर्या आयुष्यातही शिवभक्त आहे. तिला लहानपणापासूनच भगवान शिवावर खूप विश्वास आहे. ती नेहमी शिव मंदिरात जाते आणि शिवलिंगाला दूध अर्पण करत असते. ती शिवाची पूजा करते. नागिन या गाजलेल्या मालिकांसह ती अनेक बॉलिवूड चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये झळकली आहे.