मुंबई : बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा वाढदिवस 24 फेब्रुवारी रोजी वाढदिवस झाला. आता त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भन्साळी यांनी आपला वाढदिवस आगामी 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाच्या कलाकारांबरोबर साजरा केला. आलियानं सोशल मीडियावर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची एक झलक शेअर केली आहेत. याशिवाय तिनं तिच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टवर आलियानं लिहिलं,'आमच्या दिग्दर्शकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्रीच्या शूटिंगमधून एक छोटासा ब्रेक. जादूगर सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ( आमच्या गंगूलाही 3 वर्ष पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा) आणि विकीनं कौशलनं 'छावा' चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याबद्दल अभिनंदन!!! चलो अभी पार्टी संपली... पुन्हा शूटिंगला.'
संजय लीला भन्साळी यांचा वाढदिवस : आलिया भट्टनं दोन फोटो शेअर केले आहेत, पहिल्या फोटोमध्ये संजय लीला भन्साळी, आलिया, विकी कौशल आणि रणबीर कपूर एकत्र असल्याचे दिसत आहेत. तसेच दुसऱ्या फोटोत विकी कौशल केक कापताना दिसत आहे. आता आलियाची ही पोस्ट अनेकांना आवडत आहे. 'लव्ह अँड वॉर' हा धमाकेदार चित्रपट असणार आहे. यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे स्टार्स मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. तसेच आलिया आणि रणबीर शेवटी एकज्ञ 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसले होते, त्यानंतर ते या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट आधी 2025च्या ख्रिसमससाठी नियोजित करण्यात होता, मात्र आता हा चित्रपट 2026च्या सुरुवातीला प्रदर्शित होऊ शकतो.
वर्कफ्रंट : तसेच संजय लीला भन्साळी यांचा शेवटचा प्रोजेक्ट 'हीरामंडी' होता ज्यामध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा सारख्या कलाकारांनी काम केलं होतं. ही वेब सीरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. तसेच या सीरीजचा दुसरा सीझन देखील जाहीर करण्यात आला आहे. तसेच आलिया शेवटी 'जिग्रा'मध्ये दिसली होती. रणबीर कपूर हा शेवटी 'अॅनिमल'मध्ये दिसला होता. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर जबरदस्त हिट झाला होता. विकी कौशल सध्या त्याच्या 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्याचबरोबर विकी कौशलच्या अभिनयाचं देखील आता खूप कौतुक केलं जात आहे.
हेही वाचा :