हॅमिल्टन NZ Beat SL by 113 Runs : न्यूझीलंड क्रिकेट संघानं दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा 113 धावांनी पराभव केला आहे. त्याचा या मालिकेतील हा सलग दुसरा विजय आहे. यासह त्यांनी मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. पावसामुळं हा सामना केवळ 37 षटकांचाच खेळता आला. प्रथम फलंदाजी करताना कीवी संघानं 9 गडी गमावून 255 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 142 धावांवर गडगडला. न्यूझीलंडसाठी, रचिन रवींद्रनं या सामन्यात चमकदार कामगिरी केली आणि 63 चेंडूत 79 धावांची खेळी केली. यासाठी त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
Series secured! An all round performance with the ball led by Will O'Rourke (3-31 from 6.2 overs) helps claim the Chemist Warehouse ODI series with a game to spare. Scorecard | https://t.co/Yebpn1QwRR 📲 #NZvSL #CricketNation pic.twitter.com/gvDUu2OxTb
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 8, 2025
प्रत्येक विभागात चांगली कामगिरी : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या खेळाडूंनी एका संघाप्रमाणे कामगिरी केली. फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, कीवी संघानं प्रत्येक विभागात चांगली कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी 31 धावांवर पहिली विकेट गमावली. यानंतर रचिन रवींद्रनं मार्क चॅपमनसोबत 112 धावांची भागीदारी केली. रचिननं 79 आणि चॅपमननं 63 धावा केल्या. मात्र, यानंतर कीवी संघानं लागोपाठच्या अंतरानं 3 विकेट गमावल्या.
Nathan Smith! A screamer on the Seddon Park boundary to dismiss Eshan Malinga 🔥 #NZvSL #CricketNation pic.twitter.com/sQKm8aS07F
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 8, 2025
लंकेचे फलंदाज स्वतात बाद : मात्र नंतर डॅरिल मिशेलनं 38 धावा, ग्लेन फिलिप्सनं 22 धावा आणि कर्णधार मिचेल सँटनरनं 20 धावा करत संघाला 255 धावांपर्यंत नेलं. फलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीनंतर गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. जेकब डफी, मॅच हेन्री आणि विल्यम ओ'रुर्के यांनी मिळून श्रीलंकेच्या टॉप ऑर्डरची शिकार केली आणि त्यांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. अवघ्या 22 धावांवर श्रीलंकेच्या संघानं 4 विकेट गमावल्या. तर 79 धावांवर निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
A 112-run second-wicket partnership between Rachin Ravindra (79) and Mark Chapman (62) leading the batting innings in Hamilton. Follow the Sri Lanka chase LIVE and free in NZ with TVNZ DUKE, TVNZ+, Sport Nation and The ACC. LIVE scoring | https://t.co/Yebpn1QwRR 📲 #NZvSL pic.twitter.com/oRaczayVQX
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 8, 2025
सर्व गोलंदाजांची चांगली गोलंदाजी : त्यानंतर सामन्यात केवळ औपचारिकता राहिली. मात्र, कामिंडू मेंडिसनं 64 धावा करत थोडा प्रयत्न केला पण तो पराभव टाळू शकला नाही. कारण त्याला एकाही फलंदाजानं साथ दिली नाही आणि संपूर्ण संघ पुढील 63 धावा करण्यात अपयशी ठरला. न्यूझीलंडकडून ओ'रुर्कनं सर्वाधिक 3 आणि डफीनं 2 बळी घेतले. तर हेन्री, नॅथन स्मिथ आणि सँटनरनं 1-1 विकेट घेतली. किवी संघाच्या क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजांना भरपूर साथ दिली. त्यांनी अनेक आश्चर्यकारक झेल घेतले.
New Zealand seal the ODI series with an unassailable 2-0 lead over Sri Lanka after a rain-affected clash 🏏#SLvNZ 📝: https://t.co/8kXsIxrzXf pic.twitter.com/OXmEfdKcv9
— ICC (@ICC) January 8, 2025
तीक्षनानं घेतली हॅटट्रिक : महिष तिक्षानानं या सामन्यात 8 षटकं टाकली आणि 44 धावांत एकूण 4 बळी घेतले. यात त्यानं हॅट्ट्रिकद्वारे 3 बळी घेतले. महिष तिक्षानाच्या हॅटट्रिकमध्ये अडकणारा पहिला फलंदाज न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर होता, जो 15 चेंडूत 20 धावा करुन बाद झाला. 34.5 व्या चेंडूवर सँटनरची विकेट घेतल्यानंतर तिक्षानानं 34.6 व्या चेंडूवर नॅथन स्मिथलाही बाद केलं. या दोन विकेट्सनंतर त्यानं आपल्या पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मॅट हेन्रीला बाद करुन हॅटट्रिक पूर्ण केली. मात्र, त्याचा संघाला फारसा उपयोग झाला नाही.
हेही वाचा :