ETV Bharat / state

महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडी ? : शरद पवारांच्या खासदारांना फोडण्याचा प्रयत्न, आरोप प्रत्यारोपावरुन रंगलं राजकारण - AJIT PAWAR VS SHARAD PAWAR

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी शरद पवार यांच्या खासदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत सुनिल तटकरे, जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Ajit Pawar vs Sharad Pawar
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 12 hours ago

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणानं गेल्या काही वर्षांत अनाकलनीय वळण घेतलं आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष फुटून नवीन दोन पक्ष तयार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांकडून अजित पवारांच्या ताब्यात गेला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला 10 जागा तर अजित पवारांच्या पक्षाला 41 जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला 8 जागा मिळाल्या तर अजित पवारांना केवळ एक जागा मिळवता आली.

शरद पवारांच्या खासदारांना फोडण्याचा प्रयत्न : अजित पवारांकडून शरद पवारांच्या खासदारांना पक्षात बोलावलं जात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यावर दोन्ही बाजुनं गदारोळ सुरु आहे. मुंबईत बुधवारी शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीसाठी आलेल्या नेत्यांनी याबाबत विविध वक्तव्यं केल्यानं या चर्चेला आणखी बळ मिळालं. शरद पवारांच्या आठ लोकसभा खासदारांपैकी सुप्रिया सुळेंना वगळून इतर 7 जणांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात येण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडून देण्यात आला, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यावर खासदार काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तटकरेंच्या या प्रस्तावावर खा सुप्रिया सुळे यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांना दूरध्वनी करुन त्यांच्याकडं या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली, अशी चर्चा आहे.

सोनिया दुहान यांच्या माध्यमातून निमंत्रण - खासदार अमर काळे : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस नेत्या सोनिया दुहान यांनी आपल्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला, असा खुलासा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभा खासदार अमर काळे यांनी केला. दुहान यांनी कॉल करुन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा आणि भाजपाला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवला, असं काळे यांनी स्पष्ट केलं. मात्र, अजित पवारांकडून सुनील तटकरेंनी किंवा इतरांनी अद्यापपर्यंत यासंदर्भात आपल्याशी संवाद साधलेला नाही, असंही काळे यांनी यावेळी स्पष्ट केलं. "सोनिया दुहान यांनी कॉल केला आणि तुम्ही आता विरोधी पक्षात आहात. तुमच्या मतदारसंघातील कामं कशी होतील, त्यामुळे तुम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत या असं निमंत्रण दुहान यांनी दिलं," अशी माहिती काळे यांनी दिली. दुहान यांना सात जणांशी संपर्क साधायचा होता, मात्र काही जणांशी त्यांनी संपर्क साधला असावा, असं काळे म्हणाले.

खासदार धैर्यशील मोहिते निलेश लंकेंनीही दिली माहिती : माढा लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अजित पवारांच्या पक्षात जाण्याविषयी अशा प्रकारे कोणीही आपल्याशी संपर्क साधलेला नाही, असं स्पष्ट केलं. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी देखील आपल्याशी कोणीही या विषयावर संपर्क साधला नसल्याची माहिती दिली.

कुणाची कुणासोबत कुठे चर्चा झाली त्याचा खुलासा करणार - सुनील तटकरे : माझी याबाबत कुणाशीही चर्चा झालेली नाही, मात्र कुणी कुणाजवळ केव्हा काय चर्चा केली, हे मी योग्य वेळी जाहीर करेल, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. "राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्यांना जनतेनं जागा दाखवून दिली आहे. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं नैराश्य दूर करण्यासाठी माझ्यावर काही आरोप झाले. पक्षाच्या बैठकीदरम्यान काहीतरी सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला," अशी टीका तटकरे यांनी केलीय.

दैवत संबोधायचं अन् खासदार फोडण्याचा प्रयत्न करायचा - जितेंद्र आव्हाड : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांच्या खासदारांना आपल्याकडं वळवण्यासाठी संपर्क साधला जात असल्याचा आरोप केला. बापाला, मुलीला बाजुला ठेवा आणि या आमच्याकडं असं सांगण्यात आल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. एकत्र येण्याची ओरड केली जात आहे, एकत्र येत असाल, तर या खासदारांना असं निमंत्रण का देता, असं ते म्हणाले. शरद पवारांना देव, दैवत, सर्वस्व म्हणायचे आणि त्यांचे खासदार फोडण्याचा प्रयत्न करायचा, असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी हा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सुनिल तटकरेंचा मोठा हस्तक्षेप - आमदार रोहित पवार : "अजित पवारांच्या पक्षातील प्रमुख नेते शरद पवारांचा आदर करत असावेत, मात्र सुनील तटकरे यांच्याबाबत असं सांगता येणार नाही. तटकरे हे प्रॅक्टिकल नेते आहेत, वाऱ्याप्रमाणे ते बाजू फिरवतात, ते भाजपासोबत सत्तेत असल्यानं त्यांच्या समस्या सुटल्या असतील. अजित पवार पक्षाचे प्रमुख नेते असले तरी तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचं बरंच काही पक्षात चालते. खासदारांबाबत अशी चर्चा झाली असं, आपल्याला वाटत नसल्याचं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं. तटकरेंचा मोठा हस्तक्षेप पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आहे. मात्र अजित पवार बोलतात ती पक्षाची भूमिका असते."

हेही वाचा :

  1. दोन्ही पवारांनी एकत्र यावं; सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य, दुसरीकडे अंकुश काकडे यांचा अजित पवारांना टोला
  2. काकांच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन : पुतण्या अजित पवार, सून सुनेत्रा पवार लवाजम्यांसह पोहोचले शरद पवारांच्या घरी
  3. मतदान कमी असतानाही शिंदे-पवारांचे जास्त आमदार कसे? शरद पवारांनी मांडली आकडेवारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.