सिडनी Australia Squad Announces : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यावर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे, जी केवळ औपचारिकता असेल कारण नुकत्याच झालेल्या मालिकेत भारताला पराभूत करुन, त्यांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप म्हणजेच WTC 2023-25 च्या अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
Thoughts on Australia's squad for the two-Test tour of Sri Lanka? #SLvAUS pic.twitter.com/kjEBuBiciM
— cricket.com.au (@cricketcomau) January 9, 2025
स्मिथवर संघाची जबाबदारी : आता WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. WTC चा अंतिम सामना 11 ते 15 जून दरम्यान लॉर्ड्सवर खेळवला जाईल. याआधी ऑस्ट्रेलियानं श्रीलंका दौऱ्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. त्यांचा नियमीत कर्णधार पॅट कमिन्स पितृत्व रजेवर असल्यानं स्टीव्ह स्मिथ श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व करणार आहे.
JUST IN: Cooper Connolly will join Australia's Test squad in Sri Lanka this month, with Steve Smith to step in as skipper | @ARamseyCricket #SLvAUS https://t.co/eenjLsNkUK
— cricket.com.au (@cricketcomau) January 9, 2025
हेझलवूड आणि मिचेस मार्शला संघात स्थान नाही : वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीतून सावरत आहे तर मिचेल मार्शला संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. या दोन्ही खेळाडूंचं लक्ष श्रीलंका दौऱ्यानंतर लगेच होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी आहे. आता या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश होतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
A potential debutant in for Australia and an interim skipper as they travel to Sri Lanka 👇#WTC25 #SLvAUShttps://t.co/NVP2tGtp43
— ICC (@ICC) January 9, 2025
सर्वाधिक धावा करणारा खेळाडू संघाबाहेर : 2024 साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरलेल्या पीटर हँड्सकॉम्बलाही श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळालेलं नाही. फिरकीचा सापळा हा श्रीलंकेत सर्वात मोठा प्रश्न बनू शकतो. अशा स्थितीत फिरकीचं जाळं कापण्यासाठी ऑस्ट्रेलिया पीटर हँड्सकॉम्बवर अवलंबून राहू शकेल, असं मानलं जात होते. त्यातच सिडनी कसोटीत पीटर हँड्सकॉम्बला पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून संघात सामील केल्यावर हा आत्मविश्वास आणखी वाढला. मात्र संघाच्या घोषणेनं हा विश्वास तडा गेला. 2024 शेफिल्ड शील्डच्या पहिल्या सहामाहीत, हँड्सकॉम्बनं 47.80 च्या सरासरीनं 478 धावा केल्या आहेत.
Introducing our 16-player squad for our Qantas Men’s Tour of Sri Lanka 🇱🇰#SLvAUS pic.twitter.com/BUWJHr5Zz4
— Cricket Australia (@CricketAus) January 9, 2025
श्रीलंकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मॅट कुनेमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन , नॅथन मॅकस्वीनी, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.
हेही वाचा :