ETV Bharat / state

सहा पट परतावा देण्याचं दाखवलं आमिष; टोरेसमध्ये भाजीवाल्यांचे चार कोटी अडकले, काय प्रकरण? - MUMBAI TORRES JEWELLERS FRAUD

कमी दिवसात भरघोस परतावा घेण्याच्या नादात मुंबईकरांना कोटींचा गंडा घालणाऱ्या टोरेस (Torres Jewellery Scam) कंपनीविरुध शिवाजी पार्क पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

vegetable seller And Torres
भाजीवाले आणि टोरेस (Etv Bharat GFX)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2025, 9:10 PM IST

मुंबई : मुंबईतील दादर परिसरात टोरेस कंपनीने (Torres Jewellery Scam) मोठा आर्थिक घोटाळा केल्याचं उघड झालं आहे. पोस्टाच्या किसान विकास योजनेत किंवा सरकार तसंच बॅंकांच्या इतर गुंतवणूक योजनांमध्ये पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे ७ ते ९ वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, फक्त वर्षभरातच गुंतवलेली रक्कम दुप्पट नव्हे तर तब्बल सहापट करुन देण्याचं कोणी आमिष दाखवली तर? मुंबईत टोरेस ज्वेलर्स कंपनीनं दुप्पट ऐवजी थेट सहापट परतावा देण्याचं आमिष नागरिकांना दाखवलं. नागरिक देखील या आमिषाला बळी पडले आणि कंपनीमध्ये गुंतवणूक केली. मात्र आतापर्यंतच्या पूर्वेइतिहासाप्रमाणे या कंपनीनं देखील काही काळ परतावा देऊन शेवटी गाशा गुंडाळला आणि गुंतवणूकदारांना कपाळाला हात लावण्याची वेळ आली.

पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल : एका वर्षात तब्बल सहापट परतावा देण्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांना धोका देणाऱ्या आणि त्यांची आर्थिक फसवणूक केलेल्या 'टोरेस ज्वेलर्स कंपनी' विरोधात मुंबई पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे. ठाणे, नवी मुंबई पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कांदिवली पोलिसांनी गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवून ते शिवाजी पार्क पोलीस स्थानकाकडं पाठवल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे सव्वा लाखापेक्षा जास्त नागरिकांनी यामध्ये पैसे गुंतवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे (EOW) केला जात आहे.

काय होती स्कीम : ४ हजार रुपयांची वस्तू घेतल्यावर त्यावर ४.२ टक्के व्याज देऊन दर आठवड्याला १६८ रुपये प्रमाणे ५२ आठवडे परतावा दिला जाईल आणि ८७३६ रुपये परत मिळतील. त्याशिवाय गिफ्ट व्हाऊचर देखील मिळेल. अशी योजना सुरुवातीला आणण्यात आली होती. या योजनेत वर्षभरातच दुपटीपेक्षा जास्त परतावा मिळण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं.

गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले : ५८८७ रुपये गुंतवल्यास ११ टक्के दराने ६४७ रुपये प्रमाणे दर आठवड्याला ५२ आठवडे परतावा दिला जाईल आणि ३३ हजार ६४४ रुपये परत मिळतील तसंच गिफ्ट व्हाऊचर मिळेल, अशा विविध योजना कंपनीतर्फे देण्यात आल्या होत्या. या योजनेतील परतावा सुमारे पावणेसहापट होतो. शेवटी शेवटी तर १२ टक्के परताव्याची आमिषं दाखवण्यात आली. कंपनीच्या या आमिषाला बळी पडून अधिक पैशांच्या हव्यासापोटी अनेक गुंतवणूकदारांनी डोळे झाकून या कंपनीच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवले होते.

टोरेस ज्वेलर्स घोटाळा 1 हजार कोटीचा असण्याची शक्यता : टोरेस ज्वेलर्स घोटाळा हा एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा असण्याची शक्यता भाजपाचे माजी खासदार डॉ. किरीट सोमैया यांनी व्यक्त केली. याबाबत ईडीला पत्र लिहून कारवाई सुरू करण्याची विनंती केली असल्याची माहिती सोमैया यांनी दिली. मीरा भाईंदर येथील नवघर पोलिसांनी कंपनीचे बँक खाते गोठवले आहे. या खात्यामध्ये सुमारे 9 कोटी पेक्षा जास्त रक्कम होती.

१४ कोटी रुपये गुंतवले : भाजीपाला विक्रेत्यांनी स्वतःचे चार कोटी रुपये स्कीममध्ये गुंतवलेत. गुंतवलेल्या रक्कमेवर सुरुवातीला काही काळ अल्प रक्कम दर आठवड्याला परत देण्यात आली. त्यामुळं त्यांचा विश्वास बसला. त्यांनी परत मित्र, नातेवाईक आणि इतरांनाही योजनेचे सदस्य बनवून सामिल केले. या सर्वांनी मिळून सुमारे १४ कोटी रुपये गुंतवले.

'त्या' हिऱ्याची किंमत फक्त पाचशे रुपये : भाजीविक्रेत्याने गुंतवणूक केलेल्या चार कोटी रुपयांच्या सुरक्षेसाठी कंपनीने त्यांना हिरा दिला होता. या हिऱ्याची किंमत लाखो रुपये असावी असं भाजीविक्रेत्याला वाटलं होतं. मात्र, त्याची तपासणी केल्यावर तो हिरा बनावट असल्याचं समोर आलं असून त्याची किंमत अवघी पाचशे रुपये असल्याचं स्पष्ट झालं आहे.

प्रकरण कसं आलं उघडकीस : 21 जून 2024 पासून ते 30 डिसेंबर 2024 या कालावधी दरम्यान प्लॅटिनम हर्न प्रा. लि. ही कंपनी आणि सदर कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्को, सीईओ तौफिक रियाझ उर्फ जॉन कारटर तसंच सदर कंपनीच्या जनरल मॅनेजर तानिया कॅसातोवा आणि कंपनीची स्टोअर इंजार्च व्हॅलेंटीना कुमार यांनी त्यांचेकडील मोजोनाईट हा खडा खरेदी केल्यावर त्यावर गुंतवलेल्या रक्कमेवर आठवड्याला 6 टक्के प्रमाणे परतावा देण्याचं आमिष दाखवलं. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून परतावा येण्यास बंद झाल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस स्थानकात गुन्हा रजिस्टर नंबर 06 बीएनएस कायद्याचे कलम 318 (4), 316 (5), 61, एम.पी.आय.डी. ॲक्ट कलम 3, 4 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रदीपकुमार मामराज वैश्य, (वय 31) या भाजी विक्रेत्याने केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. Plastic Ban In State : मुंबईत साडे तीन वर्षांत पावणे दोन लाख किलो प्लास्टिक जप्त, ५ कोटीची दंड वसुली
  2. Police take Action on Peddlers : रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांवर पालिका, पोलिसांकडून कारवाई होणार
  3. अधिकृत फेरीवाल्यांना पॅकेजची घोषणा! नोंदणी अभावी चार लाख फेरीवाले राहणार उपेक्षित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.