हॅमिल्टन Nathan Smith Catch Video : क्रिकेटच्या मैदानावर अशी काही दृश्यं अनेकदा पाहायला मिळतात, ज्यामुळं प्रेक्षक थक्क होतात. आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यानंतर तुमचे होश नक्कीच उडून जातील. हा व्हिडिओ श्रीलंका आणि न्यूझीलंड क्रिकेट संघात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्याचा आहे. श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना न्यूझीलंडच्या एका खेळाडूनं असा झेल घेतला की, तुम्हीही कौतुक करण्यापासून थांबू शकणार नाही. याला आतापर्यंतच्या सर्वोत्तम झेलांपैकी एक म्हटलं तर आश्चर्य वाटणार नाही.
फील्डर मैदानावर झाला स्पायडर मॅन : श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना न्यूझीलंडच्या नॅथन स्मिथनं असा झेल घेतला ज्याचं सर्वांकडून कौतुक होत आहे. श्रीलंकेच्या डावातील 29 वं षटक विल ओ'रुर्कनं टाकलं. स्ट्राईकवर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी ईशान मलिंगा तिथं होता. विल ओ'रुर्कनं मलिंगाकडे चेंडू टाकला, त्यानं तो झटपट मारला. चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन परत सीमारेषेच्या दिशेनं गेला. नॅथन स्मिथनं अप्रतिम चपळाई दाखवत हवेत उडी मारत चेंडू पकडला. स्मिथनं चेंडू पकडला तेव्हा तो पूर्णपणे हवेत होता. स्पायडर मॅनप्रमाणेच त्यानं हवेत असताना कॅच पूर्ण केला. यासह ईशान मलिंगाचा डाव संपुष्टात आला.
NATHAN SMITH GRABS AN ABSOLUTE STUNNER. 🤯pic.twitter.com/wDknkRRFOV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 8, 2025
सामन्यासह न्यूझीलंडनं मालिकाही जिंकली : या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघानं 37 षटकात 255 धावा केल्या. रचिन रवींद्रनं सर्वाधिक 79 धावांची खेळी खेळली. डॅरिल मिशेलनं 38 धावांचं योगदान दिलं. तर श्रीलंकेसाठी फिरकीपटू महेश तिक्षानानं हॅटट्रिक घेत चार विकेट घेतल्या. वानिंदू हसरंगानंही दोन गडी बाद केले.
Stop that, Nathan Smith! 🥵😵💫
— FanCode (@FanCode) January 8, 2025
The Kiwi took an absolute screamer inches away from the ropes as New Zealand took an unassailable lead in the ODI series! 👊#NZvSLonFanCode pic.twitter.com/7KBaL0j3Qx
श्रीलंकेचे फलंदाज अपयशी : न्यूझीलंडकडून मिळालेल्या 256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कामिंडू मेंडिसनं श्रीलंकेसाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्यानं 66 चेंडूत 64 धावा केल्या. मात्र असं असतानाही श्रीलंकेचा संघ 31व्या षटकात 142 धावांवर गडगडला. न्यूझीलंडकडून विल ओ'रुर्कनं सर्वाधिक तीन आणि जेकब डफीनं दोन गडी बाद केले. या सामन्यासह कीवी संघानं मालिकेवर कब्जा केला. न्यूझीलंडनं पहिला सामनाही जिंकला होता. आता या मालिकेतील शेवटचा सामना 11 जानेवारीला होणार आहे.
हेही वाचा :