महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धोनी आणि विराट कोहलीमध्ये मैत्रीचं नातं नाही..? खुद्ध धोनीनंच केलं स्पष्ट, पाहा व्हिडिओ - MS Dhoni and Virat Kohli - MS DHONI AND VIRAT KOHLI

MS Dhoni Relationship With Virat Kohli : विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्या नात्याबाबत धोनीनं मोठं वक्तव्य केलं आहे. दोघांच्या नात्याबद्दल खुलासा करताना त्यानं एक मोठी गोष्ट सांगितली.

MS Dhoni Relationship With Virat Kohli
धोनी आणि विराट कोहलीमध्ये मैत्रीचं नातं नाही (IANS Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 1, 2024, 5:17 PM IST

नवी दिल्ली MS Dhoni Relationship With Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीसोबतच्या नात्याबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एमएस धोनीनं स्पष्ट केलं आहे की, विराट कोहलीसोबत त्याचं नातं मैत्रीचं नाही.

धोनी आणि विराटचं नातं काय : एका कार्यक्रमादरम्यान एमएस धोनीला विराट कोहलीसोबतच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा धोनीनं उत्तर दिलं, 'आम्ही 2008 किंवा 2009 पासून एकत्र खेळत आहोत. आमच्यात वयाचा खूप फरक आहे, पण मी त्याच्या मोठ्या भावासारखा आहे, किंवा या नात्याला तुम्हाला काहीही म्हणावं. आम्ही फक्त सहकारी आहोत जे दीर्घकाळ भारतासाठी खेळत आहोत. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये आपणच आहोत.'

धोनीनंतर कोहली भारताचा कर्णधार : धोनीनं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडलं तेव्हा विराट कोहलीला कर्णधार बनवण्यात आलं होतं. त्यानं आपल्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. पण विराटचं कर्णधारपद फार काळ टिकलं नाही. तेव्हा विराटकडून कर्णधारपद काढून रोहित शर्माकडे देण्यात आलं. त्यावेळी विराट कोहलीच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. या काळात धोनीनं विराटशी बोलून खूप मदत केली. विराट कोहलीनं 2024 च्या टी-20 विश्वचषकात भारतासाठी फलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. यासोबतच श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराटला फलंदाजीतही चांगली कामगिरी करता आली नाही. आता तो बांगलादेशविरुद्ध 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. IPL मध्ये धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळलेल्या दिग्गजानं 4 वर्षांत तिसऱ्यांदा घेतली क्रिकेटमधून निवृत्ती - Legend Cricketer Retire
  2. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित-कोहलीच्या सुरक्षेला मोठा धोका; पाकिस्तानच्याच माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता - ICC Champions Trophy 2025
  3. IPL लिलावात रोहितसाठी 'या' संघानं 50 कोटी रुपये ठेवले? खुद्द मालकांनींच दिलं थेट उत्तर - Rohit Sharma

ABOUT THE AUTHOR

...view details