ETV Bharat / sports

ना गाजा वाजा... ना बँड बाजा... चुपचाप लग्न करणाऱ्या गोल्डन बॉय नीरज चोप्राची पत्नी आहे तरी कोण? - NEERAJ CHOPRA MARRIAGE

संपूर्ण देश नीरज चोप्राच्या लग्नाची वाट पाहत होता. तो कधी आणि कोणाशी लग्न करणार हे सर्वांना जाणून घ्यायचं होतं.

Neeraj Chopra Wife
गोल्डन बॉय नीरज चोप्रा (Neeraj Chopra X Account)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 20, 2025, 11:58 AM IST

नवी दिल्ली Neeraj Chopra Wife : भारताचा सुपरस्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं 2025 च्या पहिल्या महिन्यातच संपूर्ण देशाला आश्चर्यचकित केलं आहे. ऑलिंपिक सुवर्ण आणि रौप्यपदक विजेता नीरज चोप्रा विवाहबद्ध झाला आहे. या दिग्गज खेळाडूनं कोणालाही कळू दिलं नाही आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत गुप्तपणे लग्न केलं. नीरजनं शनिवार, 19 जानेवारी रोजी सोशल मीडियाद्वारे संपूर्ण जगाला याबद्दल माहिती दिली. त्यानं ज्या मुलीशी लग्न केलं तिचं नाव हिमानी आहे. पण नीरजचं मन जिंकणारी ही हिमानी कोण आहे? हा प्रश्न प्रत्येकाच्या ओठांवर आहे.

हरियाणाची आहे हिमानी : नीरज चोप्रा कोणत्या मुलीशी आणि कधी लग्न करणार हे सर्वांना जाणून घ्यायचं होतं. चाहत्यांसोबत लग्नाची माहिती शेअर करताना, नीरजनं चाहत्यांना फक्त त्याची पत्नी हिमानी हिचं नाव सांगितलं. पण चाहत्यांना हे देखील जाणून घ्यायचं आहे की हिमानी कोण आहे? खरंतर, हिमानीचं पूर्ण नाव हिमानी मोर आहे आणि नीरजप्रमाणेच तीही हरियाणाची आहे. नीरज हा हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खंद्रा गावचा रहिवासी आहे, तर हिमानी सोनीपत जिल्ह्यातील लाद्रौली गावची आहे.

अमेरिकेतून शिक्षण, टेनिसचं प्रशिक्षण दिलं : एका वृत्तानुसार, 25 वर्षीय हिमानी मोरनं तिचं सुरुवातीचं शिक्षण सोनीपतमधील एका शाळेतून केलं आणि नंतर दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून राज्यशास्त्र आणि शारीरिक शिक्षणात पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिनं अमेरिकेतील लुईझियाना राज्यातील साउथईस्टर्न लुईझियाना विद्यापीठातही शिक्षण घेतलं. तिनं केवळ अमेरिकेत शिक्षण घेतलं नाही तर तिथं टेनिस खेळली आणि टेनिस कोचिंग देखील सुरु केलं.

सध्या काय करते : तिनं अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर येथील फ्रँकलिन पियर्स विद्यापीठात स्वयंसेवक टेनिस प्रशिक्षक म्हणूनही काम केलं आहे. सध्या, ती या देशातील मॅसॅच्युसेट्स राज्यातील अमहर्स्ट कॉलेजमध्ये पदवीधर सहाय्यक आहे आणि कॉलेजच्या महिला टेनिस संघाला प्रशिक्षण देण्याव्यतिरिक्त, ती त्यांचं पूर्णपणे व्यवस्थापन देखील करत आहे. मॅककॉर्मॅक आयझेनबर्ग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून स्पोर्ट्स मॅनेजमेंट (मेजर) पदवी देखील घेत आहे.

हेही वाचा :

  1. भारताचा डबल धमाका... पुरुष आणि महिला संघानं जिंकला पहिलाच 'वर्ल्ड कप'
  2. 8 वर्षांनंतर कांगारुंच्या धर्तीवर सामना जिंकत इंग्रज अ‍ॅशेसमध्ये पुनरागमन करणार? निर्णायक मॅच 'इथं' पाहा लाईव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.