मुंबई - ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या कोरियन सीरीज खूप पाहिल्या जात आहेत. के-ड्रामाची क्रेझ सर्वाधिक वाढली आहे. यामागचं कारण म्हणजे या सीरीजची कहाणी खूप अनोख्या पद्धतीन मांडली असते. थ्रिल, कॉमेडी आणि सस्पेन्सनं भरलेल्या सीरीज अनेकांना पाहायला खूप आवडतात. जर आम्ही सुचवलेल्या सीरीज तुम्ही पाहणार, तर तुमची नजर एका सेकंदासाठीही यावरून हटवू शकणार नाही. आता आम्ही अशाच काही पाच कोरियन सीरीजबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही पाहू शकता. या पाच सीरीजनं ओटीटीवर खूप धुमाकूळ घातलं होतं.
1 'विन्सेन्जो' : विन्सेंझो कॅसानो या कोरियन-इटालियन माफिया वकिलाबद्दलची कहाणी या सीरीजमध्ये सांगितली गेली आहे. या सीरीजमध्ये सॉन्ग जूंग-की विन्सेन्झो कॅसानो आणि जीन यो-बिन ही हांग चा-यंगच्या भूमिकेत आहेत. या सीरीजमध्ये विन्सेंझो हा लपवलेले सोने परत मिळवण्यासाठी आणि बॅबेल शक्तिशाली औषध ग्रुपला पाडण्यासाठी वकील हाँग चा-यंग (जिओन येओ-बिन) सोबत काम करतो. यानंतर तो हाँग चा-यंगच्या प्रेमात पडतो. ही सीरीज थ्रिल, कॉमेडी आणि सस्पेन्सने भरलेली आहे. सूड, मुक्तता आणि सामाजिक न्याय या थीमवर आधारित ही सीरीज आहे. 'विन्सेन्जो' माफिया लॉयरला पाहण्यासाठी तुम्हाला नेटफ्लिक्सवर जावं लागेल. ही सीरीज तिथे हिंदीमध्ये तुम्ही पाहू शकता.
2 'डेस्टिन्ड विद यू' : 'डेस्टिन्ड विथ यू' हा कोरियन ड्रामा शतकानुशतके श्रापानं बाधित असलेल्या एक वकील आणि एका सरकारी सेवकाबद्दलची कहाणी आहे, ज्यांचे जीवन बदलते जेव्हा त्यांना एक रहस्यमय बॉक्स सापडतो. यामध्ये एक पुस्तक असते. या पुस्तकामध्ये एक रहस्य दडलेलं असते, हे जादूई पुस्तक कसं काम करते , हे पाहण्यासाठी ही सीरीज तुम्हाला पाहावी लागेल. या सीरीजमध्ये 'रोउन' उर्फ किम सोक-वू आणि जो बो-आह हे मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांमधील अनपेक्षित प्रेमकहाणी खूप सुंदर पद्धतीन मांडली गेली आहे. ही सीरीज तुम्हाला नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये पाहायला मिळेल.
3 'इट्स ओके टू नॉट बी ओके' : 'इट्स ओके टू नॉट बी ओके' के-ड्रामा बारकावेदार लेखन आणि पात्राच्या दमदार अभिनयानामुळे तुम्हाला नक्की आवडेल. या सीरीजमध्ये अभिनेत्री सेओ ये जी, किम सू-ह्यून आणि ओह जंग-से यांनी मुख्य भूमिकेत काम केलं आहे. या सीरीजमध्ये (सेओ ये जी) को मून-यंग ही एक लेखिका एका मनोरुग्णालयातील आरोग्य कर्मचारी (किम सू-ह्यून) मून कांग ताईच्या प्रेमात पडते. को मून यंग, एक यशस्वी बालपुस्तक लेखिका असते. यानंतर तिच्या जीवनातील ज्या समस्या असतात, त्या मून कांग ताईकडून सर्व निराकरण होते. या सीरीजमध्ये को मून यंगच्या आईबद्दलचं रहस्य किती भितीदायक असते यावर हा ड्रामा आधारित आहे. नेटफ्लिक्सवर तुम्ही हा ड्रामा पाहू शकता.
4 बिहाइंड योर टच : 'बिहाइंड योर टच' सीरीजमध्ये शहरातील किरकोळ गुन्ह्यांची उकल करण्यासाठी एक प्राण्यांची डॉक्टर आणि गुप्तहेर पथक एकत्र येतात. या सीरीजमध्ये एका भयानक किलरचे रहस्य उलगडण्याचे यश यांच्या टीमला येते. या सीरीजमध्ये हान जी-मिन, ली मिन-की आणि सुहो यांनी मुख्य भूमिकेत काम केलं आहे. ही सीरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
'गोब्लिन द लोनली अँड ग्रेट गॉड' : 'गोब्लिन द लोनली अँड ग्रेट गॉड' सीरीजमध्ये किम शिन हा गोरियो राजवंशातील एक सन्मानित लष्करी सेनापती आहे, ज्याला एक राजा फसवून मारतो. यानंतर तो एका श्रापामुळे अमर राहतो त्याच्या अमरत्वाचा अंत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गोब्लिनच्या वधूनं त्याच्या छातीतून तलवार काढणे असतो. या सीरीजमध्ये गोंग यो, किम गो-यून, ली डोंग-वूक आणि योक सुंगजे यांनी मुख्य भूमिकेत काम केलं आहे. ही दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक पाहिली गेलेली सीरीज आहे.
हेही वाचा :
नवीन काही पाहायचं आहे? पाहा ओटीटीवरील सर्वोत्तम पाच कोरियन सीरीज...