नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प २०२५ सादर करताना काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे काही उत्पादने स्वस्त तर काही उत्पादने महाग होणार आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या महत्त्वाच्या घोषणा
- केंद्र सरकारनं इलेक्ट्रिक वाहन उद्योगांना चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार लिथियम बॅटरीत लागाणारी कोबाल्ट पावडर स्वस्त करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन उद्योगांमधील लिथियमच्या उत्पादन खर्चात कपात होणार आहे. त्याचाच परिणाम म्हणून इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होण्याची शक्यता आहे. एकंदरीत इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.
- टीव्हीचे देशांतर्गत पार्ट्स स्वस्त होणार आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी विदेशातून भारतात येणाऱ्या फ्लॅट पॅनेलवरील कर १० टक्क्यांवरून २० टक्के लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशात टीव्हीचे सुट्टे पार्ट्स स्वस्त होणार आहेत.
- भारतात तयार केलेली कपडे स्वस्त होणार आहेत. कापड उद्योगाला चालना देण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे.
- देशांतर्गत मोबाईल फोनचे उत्पादन वाढविण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्या धोरणाला अनुसरून मोबाईल फोनदेखील स्वस्त होणार आहे.
- 82 वस्तुंवरील सेस हटविण्यात आला आहे.
- ३६ जीवनावश्यक औषधांना सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
- कर्करोगाची आयात होणारी औषधे महाग असतात. अशा काही औषधांवरील सीमाशुल्क रद्द करण्यात येणार आहे.
- देशात वैद्यकीय क्षेत्राला चालना मिळण्याकरिता मेडिकल उपकरणे स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा-