पुणे : पुणे शहराला जसं विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, तसंच सांस्कृतिक राजधानी देखील म्हटलं जातं. अशा या सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात आता पुणेकरांना अवघ्या 49 रुपयात (watch movies in 49 RS only) मराठी चित्रपट पाहायला मिळणार आहेत.
49 रुपयात बघा 6 चित्रपट : मराठी चित्रपट असोसिएशन तर्फे येत्या 22 आणि 23 जानेवारी रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलय. या महोत्सवात अवघ्या 49 रुपयांत 6 मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये स्क्रिनिंग मिळत नसल्यानं हे चित्रपट नाट्यगृहात दाखवले जाणार असल्याचं महोत्सवाच्या आयोजकांनी सांगितलय.
'हे' 6 चित्रपट बघायला मिळणार : यासंदर्भात अधिक माहिती देत या चित्रपट महोत्सवाचे आयोजक कौस्तुभ कुलकर्णी म्हणाले की, "22 आणि 23 जानेवारीला हा चित्रपट महोत्सव होणार आहे. यामध्ये 6 मराठी चित्रपट दाखवले जाणार असून त्याच्या 10 स्क्रिनिंग होतील. या महोत्सवामध्ये आम्ही नुकतेच प्रदर्शित झालेले पाणीपुरी, मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी, हॅशटॅग तदेव लग्नम, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, अल्याड पल्याड, श्री गणेशा हे चित्रपट केवळ 49 रुपयात आम्ही दाखवणार आहोत." तसंच एका दिवसात जवळपास 1200 हून अधिक तिकीट विक्री झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
पुढं ते म्हणाले, "मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळत नाही ही आताची ओरड आहे. मराठी चित्रपटांना जरी शो मिळाले तरी ते कमी प्रमाणात मिळतात. तसंच दोन ते चार दिवसात ते काढले जातात. यामुळं नाट्यगृहात जर चित्रपट महोत्सवाच्या अनुषंगानं हे चित्रपट दाखवले गेले तर प्रेक्षक देखील हे चित्रपट बघायला येतील. त्यामुळंच आम्ही या चित्रपट महोत्सवाचं आयोजन केलं आहे.
हेही वाचा -