क्वालालंपूर ICC U19 Womens Cricket World Cup : क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. त्याचं नवीनतम उदाहरण ICC अंडर 19 महिला T20 विश्वचषकात दिसून आलं, जिथं नायजेरियानं क्रिकेट जगताला धक्का दिला आहे. त्यांनी न्यूझीलंडला अपेक्षेच्या विपरित हरवलं आहे. न्यूझीलंड हा संघ स्पर्धा जिंकण्याच्या दावेदारांच्या यादीत आहे. पण महिलांच्या 19 वर्षांखालील विश्वचषकात, त्या दोन धावा त्यांच्यासाठी महागड्या ठरल्या. परिणामी त्यांचं विजयाचं खातं उघडता उघडता राहिलं.
Nigeria are jubilant after stunning New Zealand in the 2025 #U19WorldCup 👊 pic.twitter.com/y6Mnifkekg
— ICC (@ICC) January 20, 2025
नायजेरियानं न्यूझीलंडला हरवलं : ICC अंडर 19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील ग्रुप सी मधील न्यूझीलंड आणि नायजेरिया यांच्यातील हा दुसरा सामना होता. यापूर्वी, न्यूझीलंडला पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. तर नायजेरियाचा सामना अनिर्णीत राहिला. अशा परिस्थितीत हा सामना दोघांसाठीही महत्त्वाचा होता. नायजेरियाविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा वरचष्मा होता. पण, नायजेरियानं न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघावर मात करुन क्रिकेट विश्वाला धक्का दिला आहे.
Skipper Piety Lucky was at the heart of Nigeria's first-ever victory in #U19WorldCup history 🤩
— ICC (@ICC) January 20, 2025
She wins the @aramco POTM award 🎖️ pic.twitter.com/ofjHvOKarp
नायजेरियाचा 2 धावांनी रोमांचक विजय : नायजेरिया आणि न्यूझीलंड महिला संघांतील सामन्यावर पावसाचा परिणाम झाला. पावसामुळं सामन्यातील षटकांची संख्याही कमी करण्यात आली. दोन्ही संघांमध्ये 13-13 षटकांचा सामना खेळवण्यात आला. नायजेरियानं प्रथम फलंदाजी केली आणि 13 षटकांत 6 बाद 65 धावा केल्या. न्यूझीलंडसमोर 66 धावांचं सोपं लक्ष्य होतं. पण या धावसंख्येचा पाठलाग करताना त्यांचा डाव 2 धावांनी कमी पडला. पूर्ण 13 षटकं खेळल्यानंतर न्यूझीलंडनं 6 बाद 63 धावा केल्या.
A historic first #U19WorldCup win for Nigeria 👏
— ICC (@ICC) January 20, 2025
📝: https://t.co/VdlPdINwlE pic.twitter.com/gJmwfLsHER
पराभवामुळं न्यूझीलंडचा मार्ग कठीण : नायजेरियाकडून पराभव पत्करल्यानंतर आता न्यूझीलंडला पुढील फेरीत पोहोचणं कठीण झालं आहे. प्रत्येक गटातून फक्त 2 संघ स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश करतील. दोन्ही संघांकडून सलग दोन पराभवांनंतर, न्यूझीलंडच्या 19 वर्षांखालील महिला संघासाठी आता पुढील फेरी गाठणं कठीण वाटू लागलं आहे. न्यूझीलंडला आता गट फेरीत आणखी एक सामना खेळायचा आहे. दुसरीकडे, नायजेरिया 2 सामन्यांत 1 विजय आणि 1 बरोबरीसह त्यांच्या गट गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यांचे 2 सामन्यांनंतर 3 गुण आहेत. या संघाला आपला पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे. जरी नायजेरिया दक्षिण आफ्रिकेकडून हरला तरी त्यांना पुढील फेरीत जाण्याची संधी राहील. कारण पुढचा सामना जिंकल्यानंतरही न्यूझीलंडचे फक्त 2 गुण राहतील.
हेही वाचा :