चेन्नई IND vs BAN 1st Test Live Streaming Free : बांगलादेशचा क्रिकेट संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी रविवारी भारतात दाखल झाला. सध्या भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ पहिल्या कसोटीच्या सरावात व्यस्त आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि नजमुल हुसेन शांतो कोणत्याही किंमतीला ही मालिका जिंकण्याचा प्रयत्न करतील.
भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये : पाकिस्तानला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर बांगलादेशचा संघ भारतात येत आहे. अशा स्थितीत संघाचं मनोबल उंचावलेलं आहे. दुसरीकडे, भारतीय संघ बांगलादेशकडून आतापर्यंत कसोटीत पराभूत झालेला नाही. अशा परिस्थितीत दोन्ही संघांनी एकमेकांपासून सावध राहण्याची गरज आहे. मालिकेची सुरुवात आजपासून पहिल्या कसोटीनं होणार आहे.
- भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना कधी होणार?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवार 19 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे.
- भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना कुठं होणार आहे?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सुरु होईल.
- भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचं थेट प्रक्षेपण कसं पहावं?