कटक Team India Record At Cuttack : भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियानं 4 विकेट्सनं विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना दोन्ही संघांमध्ये 9 फेब्रुवारी रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला जाईल. कटकच्या या मैदानावर टीम इंडिया जवळजवळ 6 वर्षांनी वनडे सामना खेळणार आहे. अशा परिस्थितीत, सर्वांचं लक्ष भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या विक्रमावर असेल.
कटकच्या मैदानावर टीम इंडियानं खेळले 19 सामने : जर आपण कटकच्या बाराबती स्टेडियमबद्दल बोललो तर आतापर्यंत इथं 21 वनडे सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 19 सामने भारतीय संघानं खेळले आहेत. इथं खेळल्या गेलेल्या 21 वनडे सामन्यांपैकी 2 सामने रद्द झाले तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं 12 सामने जिंकले तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त 7 सामने जिंकता आले. या मैदानावर खेळल्या गेलेल्या 19 पैकी 13 सामन्यांमध्ये टीम इंडियानं विजय मिळवला आहे, तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर 2 सामने रद्द करण्यात आले आहेत. या खेळपट्टीवर पहिल्या डावात सरासरी 225 ते 230 धावा झाल्या आहेत.