ETV Bharat / sports

वन-डे मालिका भारताच्या खिशात; रोहित शर्माची दमदार शतकी खेळी, मोडले अनेक विक्रम - ENG VS IND 2ND ODI

इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात विजय मिळवत भारतानं मालिका खिशात घातली. या सामन्यात दमदार फलंदाजी करत रोहित शर्मानं शतकी खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

ENG VS IND 2ND ODI
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (AP)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Feb 9, 2025, 9:58 PM IST

Updated : Feb 9, 2025, 10:36 PM IST

कटक : इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं इंग्लंडचा चार विकेट्सनं पराभव करत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडनं बेन डकेट आणि जो रूट यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ४९.५ षटकांत १० गडी गमावून ३०४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर भारतानं ४४.३ षटकांत सहा गडी गमावून ३०८ धावा करत सामना जिंकला. दोन्ही संघांमधील तिसरा सामना १२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे.

वन-डे मालिका भारताच्या खिशात : इंग्लंडविरूद्धचा दुसरा सामना कटकच्या मैदानावर खेळवण्यात आला. सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं सर्व फलंदाज गमावून ३०४ धावा करत भारताला विजयसाठी ३०५ धावांचं आव्हान दिलं. फलंदाजीत इंग्लंडकडून बेन डकेट आणि जो रूट यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडनं ३०० धावांचा टप्पा ओलांडला. यात लिविंगस्टोननं ४१ धावांचं योगदान देत मोलाची भूमिका पार पाडली. गोलंदाजीत भारताकडून रवींद्र जडेजानं सर्वाधिक तीन फलंदाज बाद केले. तर, शमी, हर्षित राणा, हार्दिक पंड्या आणि वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

अर्धशतकी खेळी करून शुभमन बाद : लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली, जी जेमी ओव्हरटननं फोडली. त्यानं १७ व्या षटकात शुभमन गिलला बाद केलं. त्यानं ५२ चेंडूत ६० धावा केल्या. शुभमननं सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. गिलने ४५ चेंडूत त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १५ वे अर्धशतक पूर्ण केले.

विराटकडून पुन्हा निराशा : गिल बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेला विराट कोहली मैदानावर फार काळ टिकू शकला नाही. तो अवघ्या पाच धावा करून बाद झाला. यानंतर रोहित आणि श्रेयस अय्यर यांनी धावफलक हलता ठेवला. सामन्याच्या ३० व्या ओव्हरमध्ये शतक झळकवून रोहित शर्मा बाद झाला. रोहितनं आपल्या खेळीत ९० बॉलमध्ये १२ चौकार आणि ७ चौकारांच्या मदतीनं ११९ धावांची खेळी केली.

सामन्यात भारताचा विजय : रोहित बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अक्षर पटेलनं ४१, श्रेयस अय्यर ४४, हार्दिक पंड्यान १०, अक्षर पटेलने ४१* आणि रवींद्र जडेजाने ११* धावा केल्या. इंग्लंडकडून जेमी ओव्हरटनने दोन तर गस अ‍ॅटकिन्सन, आदिल रशीद आणि लियाम लिव्हिंगस्टोननं प्रत्येकी एक विकेट घेतली.

रोहितचं दमदार पुनरागमन : रोहित शर्माची बॅट बराच वेळ शांत होती. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात त्यानं तुफानी शतक झळकावलं. यासाठी त्यानं ७६ चेंडूंचा सामना केला. आपल्या शतकी खेळीमध्ये ७ षटकार आणि १२ चौकार मारले. रोहित शर्माच्या वन-डे कारकिर्दीतील हे ३२ वे शतक आहे. त्यानं १३२ च्या स्ट्राईक रेटनं ९० चेंडूत ११९ धावांची खेळी केली. रोहितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३३८ दिवसांनी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४७५ दिवसांनी शतक ठोकलं.

रोहितने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम : रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून भारताचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. या बाबतीत त्यानं भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मागं टाकलं आहे. सचिन तेंडुलकरनं ३४६ सामन्यांमध्ये ४८.०७ च्या सरासरीनं १५,३३५ धावा केल्या आहेत. याबाबतीत रोहित सचिनच्या धावसंख्येपासून फक्त ५० धावांनी मागे होता. सामन्यात अर्धशतक झळकवत त्यानं सचिनला मागं टाकलं.

हेही वाचा :

  1. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 'इंडिया' आघाडीवर टीका; म्हणाले, "सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी..."
  2. पुण्यातील कोंढवा परिसरातील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू तर एक जखमी
  3. साहेब...साहेब, शिर्डीत गोळीबार झालाय; पुढं काय झालं? वाचा सविस्तर...

Last Updated : Feb 9, 2025, 10:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.