बाराबंकीhockey player babu KD Singh : महान हॉकीपटू केडी बाबू सिंह यांच्या वडिलोपार्जित वाड्याचा लिलाव केला जात आहे. कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून या वाड्याचा लिलाव करण्याची वेळी आली आहे. या वाड्याचा लिलाव 11 मार्च रोजी दिवाणी न्यायाधीश न्यायालयात होणार आहे. त्याची किमान किंमत 5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. केडी बाबूं सिंह याचा हा वाडा संपत्तीच्या वादामुळं बराच काळ चर्चेत होता. वाद वाढल्यामुळं हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे.
वाड्याचा लिलाव करण्याचे आदेश : हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील आहे. येथे भारतीय हॉकी संघाचं कर्णधार केडी बाबू सिंह यांचा वाडा आहे. यावरून त्यांच्या कुटुंबात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरात सुमारे 35 हजार स्क्वेअर फुटांवर हा वाडा बांधला आहे. 31 जानेवारी 2024 रोजी, ACJM/दिवाणी न्यायाधीश खान झीशान मसूद यांनी मालमत्ता विकून सर्व वारसांना त्यांच्या वाट्याप्रमाणे पैसे वाटून देण्याचं आदेश दिलं होते.
काय आहे वाड्याचा वाद : याच महिन्यात 15 फेब्रुवारीला या वाड्याला सील ठोकण्यात आलं आहे. या प्रकरणातील सुनावणीदरम्यान लखनौच्या रहिवासी अमिता दत्त यांनी मध्यस्थी करावी, असा अर्ज न्यायालयात दिला होता. यावर वकिलांनी आक्षेप घेतला होता. यानंतर न्यायालयानं अमिता दत्तचा अर्ज फेटाळून लावत 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. किमान बोली 5 कोटी रुपयांपासून सुरू होईल, असं न्यायालयानं लिलावाच्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.