Hardik Pandya Natasha Stankovic Divorce:भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून चर्चेचा मोठा विषय आहे. हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाला अपेक्षित यश मिळालं नाही. तेव्हापासून क्रिकेटप्रेमींकडुंन हार्दिकवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
एकीकडे करिअरमध्ये बॅड पॅच सुरू असतानाच आता चर्चा अशीही आहे की, हार्दिक आणि पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यातील नात्यात कटुता निर्माण झाली आहे. दोघांचाही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा आलेला नाही. घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याची 70 टक्के संपत्ती पत्नी नताशा स्टॅनकोविककडे जाणार असल्याचीदेखील चर्चा आहे.
नताशाची इन्स्टाग्राम स्टोरी: नताशानं वाहतूक चिन्हांचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला. त्यात कुणीतरी रस्त्यावर येणार असं तिनं म्हटलं आहे. तिनं इन्स्टाग्राम स्टोरीमधून हार्दिक पांड्याला इशारा दिल्याचा अंदाज व्यक्त केला करण्यात येतोय. तिनं मागील शनिवारी तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये येशूची झलक दिसतेय. नताशानं या फोटोसोबत कोणतेही कॅप्शन दिलेलं नाही. घटस्फोटाच्या अफवांनंतर गेल्या शनिवारीच नताशा ही दिशा पटानीचा कथित बॉयफ्रेंड अलेक्झांडर अलेक्सलिकसोबत दिसली. दोघेही जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये पोहोचले होते. रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पापाराझींनी दोघांनाही कॅमेऱ्यात कैद केलं. यादरम्यान एका पापाराझीनं नताशाला तिच्या घटस्फोटाच्या अफवांबद्दल विचारलं. यावर नताशानं प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ती हसली आणि 'थँक्यू' म्हणून गाडीकडे निघाली. नताशानं यापूर्वी हार्दिकचं आडनाव इन्स्टाग्रामवर वापरलं होतं. परंतु आता तिनं हे आडनावही आता काढून टाकलं आहे.
- हार्दिक-नताशाचं लग्न कधी झालं?: हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा विवाह 31 मे 2020 रोजी झाला होता. या जोडप्यानं कोरोनाच्या काळात साधेपणानं लग्न केले. पण त्यानंतर 2023 मध्ये दोघांनी हिंदू रितीरिवाज आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार मोठ्या जल्लोषात लग्न केलं. या जोडप्याला एक मुलगा आहे. त्याचं नाव अगस्त्य आहे.