नवी दिल्ली SA T20 League : दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेननं आपल्या बॅटनं झंझावाती विक्रमी अर्धशतक झळकावलंय. त्याचं हे अर्धशतक दक्षिण आफ्रिका टी 20 लीगमध्ये आलंय. या खेळीत त्यानं फक्त 16 चेंडूत अर्धशतक ठोकलंय. या खेळीसह त्यानं दक्षिण आफ्रिका टी 20 लीगच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक केलंय. या सामन्यात त्यांच्या संघानं 125 धावांनी दणदणीत विजय मिळवलाय.
हेनरिक क्लासेननं 16 चेंडूत झळकावलं झंझावाती अर्धशतक : दक्षिण आफ्रिका टी 20 लीगच्या 22 व्या सामन्यात हेनरिक क्लासेननं तुफानी खेळी केली. डर्बन सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या क्लासेननं त्याच्या घरच्या मैदानावर पर्ल रॉयल्सविरुद्ध ही खेळी केली. या सामन्यात त्यानं 312.5 च्या तुफानी स्ट्राईक रेटनं अवघ्या 16 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांसह 50 धावांचं अर्धशतक झळकावलं. मैदानात आलेल्या प्रेक्षकांना त्यानं थराराचा पुरेपूर डोस देत आपल्या संघाला विजयापर्यंत नेलं.
डर्बन सुपर जायंट्सचा 125 धावांनी दणदणीत विजय : या सामन्यात डर्बन सुपर जायंट्स संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 208 धावांचा डोंगर उभारला. या 208 धावांमध्ये क्लासेनच्या स्फोटक खेळीचाही समावेश होता. यानंतर 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पर्ल रॉयल्स संघ 13.2 षटकांत 83 धावांत गडगडला आणि त्यांना 125 धावांनी सामना गमावला. या सामन्यात अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज नूर अहमदनं डरबन सुपर जायंट्सकडून 3.2 षटकात 11 धावा देत 5 बळी घेतले. डर्बनचा पर्ल रॉयल्स संघावर या हंगामातील हा दुसरा विजय आहे.
हेही वाचा :
- इंग्लंडच्या पार्टटाईम फिरकीपटूनं उद्धवस्त केलं भारतीय संघाचं 'रुट'; भारताकडं भक्कम आघाडी, दुसऱ्या डावात साहेबांना पहिला धक्का
- आगामी टी-20 विश्वचषकापुर्वी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मोठा दिलासा; आयसीसीनं घेतला 'हा' मोठा निर्णय
- करेबियन संघानं रचला इतिहास! 27 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मिळवला कसोटीत विजय
- पहिली कसोटी: ओली पोपचा भारतीय गोलंदाजांना 'चोप'; विक्रमी खेळी करत भारताला दिलं 231 धावांचं लक्ष्य