मिरपूर Batter out Twice on Same Ball : बांगलादेश प्रीमियर लीग सध्या बांगलादेशमध्ये खेळली जात आहे. या क्रिकेट लीगमध्ये एक विचित्र घटना पाहायला मिळाली आहे. बांगलादेश प्रीमियर लीग 2024-25 चा तिसरा सामना खुलना टायगर्स आणि चितगाव किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात खुलना टायगर्सच्या खेळाडूसोबत असं काही घडलं जे क्रिकेटच्या मैदानावर क्वचितच पाहायला मिळतं. या खेळाडूनं सामन्यात फक्त 1 चेंडू खेळला, पण तो 2 वेळा बाद झाला.
क्रिकेटच्या मैदानावर एक विचित्र घटना घडली : 2023 च्या वनडे विश्वचषकादरम्यान टाइमआउटचा वाद प्रकाशझोतात आला होता. श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट देण्यात आलं होतं. ICC च्या नियमांनुसार, फलंदाज बाद झाल्यावर तीन मिनिटांत नवीन फलंदाजाला क्रीजवर यावं लागतं. त्याचबरोबर विश्वचषकात ही वेळ केवळ दोन मिनिटांची होती. मात्र अँजेलो मॅथ्यूजला त्यात अपयश आलं होतं. आता अशीच एक घटना बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये चितगाव किंग्जचा खेळाडू टॉम ओ'कॉनेलसोबत घडली आहे. ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर टॉम ओ'कॉनेल तीन मिनिटं पूर्ण झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आला, त्यानंतर त्याला अंपायरनं बाद घोषित केलं.
Timeout drama in #BPL! 😵
— FanCode (@FanCode) December 31, 2024
Skipper Mehidy Hasan Miraz sportingly called Tom O'Connell back after he was timed out by the umpires! 🤝#BPLonFanCode pic.twitter.com/0bEIDBfRYj
खेळाडूंनी फलंदाजाला परत बोलावलं : पण, खुलना टायगर्सचा कर्णधार मेहदी हसन मिराजनं टॉम ओ'कॉनेलला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावण्याचा निर्णय घेतला. यानंतर सर्वजण मेहदी हसन मिराजचं कौतुक करत आहेत. या घटनेदरम्यान, कॅप्टन मेहदी त्याच्या अनेक सहकाऱ्यांसह अंपायरकडं गेला आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर टॉम ओ'कॉनेलला परत बोलावलं. पण टॉम ओ'कॉनेलला या संधीचा फायदा घेता आला नाही आणि पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. म्हणजेच या सामन्यात तो एकच चेंडू खेळू शकला आणि दोनदा बाद झाला.
खुलना टायगर्सचा संघ विजयी : सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, खुलना टायगर्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 203 धावा केल्या. यादरम्यान विल्यम बोसिस्टोनं 50 चेंडूत नाबाद 75 धावा केल्या. तर महिदुल इस्लाम अंकोननं 22 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. दुसरीकडे, चितगाव किंग्ज संघ केवळ 18.5 षटकंच खेळू शकला आणि 166 धावा करुन सर्वबाद झाला. त्यामुळं त्याला 37 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
हेही वाचा :