मेष (ARIES) : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सगळ्या कामात यश मिळाल्यानं आपण खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल. आर्थिक लाभ सुद्धा होईल. मित्र आणि सगे सोयरे ह्यांच्या भेटीनं घरातील वातावरण आनंदी होईल. चांगले कपडे आणि भोजन भेटेल. मित्र आमि शुभेच्छुक ह्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्यानं आपण आनंदित व्हाल.
वृषभ (TAURUS) : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र लाभात आहे. आज सावध राहावं लागेल. आपलं मन अनेक प्रकारच्या चिंतांनी व्यग्र असेल. स्वास्थ्यही जरा नरमच राहील. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. स्नेही आणि कुटुंबीय ह्यांच्याशी मतभेद झाल्यानं आपण दुःखी व्हाल. आपण सुरू केलेलं काम अपूर्ण राहील. खर्च वाढेल. कष्टाचे योग्य फळ न मिळाल्यानं मन निराश होईल. अविचाराने घेतलेल्या निर्णयाने गैरसमज निर्माण होतील.
मिथुन (GEMINI) : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. पत्नी आणि संततीकडून फायदेशीर बातम्या मिळतील. मित्रांच्या भेटी आनंद देऊन जातील. व्यापारी वर्गाच्या प्राप्तीत भर पडेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. स्त्री मित्रांकडून लाभ संभवतो. प्रवास आनंददायी होतील. स्वास्थ्य उत्तम राहील.
कर्क (CANCER) : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात आहे. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीनं लाभदायक आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. कामाच्या ठिकाणी आपलं वर्चस्व वाढेल. बढतीची हमखास शक्यता आहे. कुटुंबात महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. आईची तब्बेत उत्तम राहील. धन- संपत्ती, मान-सन्मानाची प्राप्ती होईल. घराच्या सजावटीत फेरबदल कराल. दिवसभराच्या कामामुळं थकवा जाणवेल. प्रकृती उत्तम राहील. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.
सिंह (LEO) : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज स्वभावात संताप असल्यामुळं काम करण्यात आपलं मन लागणार नाही. वादविवादात आपल्या अहंकारामुळं कोणाची नाराजी ओढवून घ्याल. आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. उतावीळपणामुळं निर्णय घेऊन किंवा वाटचाल करून नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरी - व्यवसायात अडचणी आल्यानं नियोजित काम पूर्ण होऊ शकणार नाही. एखाद्या प्रवासाचं नियोजन कराल.
कन्या (VIRGO) : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी आहे. आज नवीन कामे सुरू केल्यास त्यात अडचणी येतील. बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते. मन रागीट होईल, म्हणून बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. अपघाताची शक्यता असल्यानं पाण्यापासून दूर राहावं. कष्टाचं योग्य फळ न मिळाल्यानं मन उदास होईल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ आणि रहस्यमय गोष्टीत रूची राहील.
तूळ (LIBRA) : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी आहे. आजचा दिवस प्रणय, प्रेमालाप, मनोरंजन आणि मौज - मस्ती करण्याचा आहे. सार्वजनिक जीवनात महत्व मिळेल. यश आणि कीर्ती वाढेल. भागीदारांशी लाभाच्या गोष्टी होतील. वस्त्रे आणि अलंकार यांची खरेदी होईल. उत्तम दांपत्यसुख आणि वाहनसुख मिळेल. प्रकृती व मनःस्वास्थ्य उत्तम राहील. मित्रांसह सहलीला जाल.
वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी आहे. आज आपण निश्चिंतपणा आणि सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल. कामाच्या ठिकाणी सहकारी वर्गाची खूप मदत झाल्यानं अनेक कामे हाता वेगळी कराल. अपूर्ण कामे तडीस जातील. आर्थिक लाभामुळं खर्च आपला ताण वाढविणार नाही.
धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी आहे. आज कार्यपूर्ती न झाल्यानं नैराश्य येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. संतती विषयक बाबींमुळं चिंता वाढतील. शक्यतो आज प्रवास टाळावेत.
मकर (CAPRICORN) : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने मन खिन्न होईल. शारीरिक स्फूर्ती, तरतरी ह्यांचा अभाव राहील. सार्वजनिक जीवनात मानहानी होण्याचा संभव आहे. छातीत दुखणं संभवत आहे. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत येऊ शकता.
कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र मीन राशीत आहे. . आपल्यासाठी चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. आज आपण तना - मनाने प्रसन्न व्हाल. मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदांसह नवीन योजना ठरवाल. त्यांच्यासह आनंदात वेळ जाईल. लहान प्रवास होतील. मित्र आणि स्वजनांच्या सहवासाने आपलं मन आनंदीत होईल. आपल्या कार्यक्षेत्रात कौशल्य पूर्वक उत्तम यश मिळवाल.
मीन (PISCES) : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस आर्थिक नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नियोजित कामे पूर्ण होतील. प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबात सुख शांतीचं वातावरण असेल. उत्कृष्ट भोजन मिळेल. स्वास्थ्य ठीक राहील, तसेच मनाचे स्वास्थ्य सुद्धा आपण चांगले टिकवून ठेवाल.
हेही वाचा -