ETV Bharat / state

ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांनी घेतली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट, ब्रिटिशकालीन बंकरची केली पाहणी - CP RADHAKRISHNAN

सध्या मुंबई भेटीवर असलेल्या ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिंन्स एडवर्ड यांनी रविवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

Governor CP Radhakrishnan
ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2025, 10:33 PM IST

मुंबई : मुंबई भेटीवर आलेल्या ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड यांनी रविवारी (दि.२ फेब्रुवारी) राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. आपल्या औपचारिक भेटीनंतर एडवर्ड यांनी राजभवनातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंना भेट दिली.

कोण आहे ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड? : राणी एलिझाबेथ द्वितीय आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिंन्स फिलिप यांचं सर्वात धाकटे सुपुत्र तसेच राजे चार्ल्स तृतीय यांचे धाकटे बंधू असलेल्या प्रिंन्स एडवर्ड यांनी सुरुवातीला राजभवनातील पूर्वी जमिनीखाली तोपखाना असलेल्या हिरवळीची पाहणी केली. याच हिरवळीवर एडवर्ड यांचे ज्येष्ठ बंधू प्रिंन्स ऑफ वेल्स चार्ल्स यांच्या सन्मानार्थ सन १९८० साली चहापान झाला होता.

ऐतिहासिक सभागृह दाखवले : त्यानंतर एडवर्ड यांनी 'जल लक्षण' या राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासाठी राखीव असलेल्या अतिथिगृहाला भेट दिली. या अतिथीगृहात सन १९६१ साली राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिंन्स फिलिप यांचा राष्ट्रीय अतिथी या नात्याने मुक्काम होता. राज्यपालांचे सचिव प्रविण दराडे आणि जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी त्यानंतर एडवर्ड यांना 'जल किरण' अतिथीगृह, 'जल विहार' हे ऐतिहासिक सभागृह तसेच ब्रिटिश कालीन बंकर दाखवले. यावेळी ब्रिटनचे उप-उच्चायुक्त हरजिंदर कांग, ड्यूक यांचे खाजगी सचिव अ‍ॅलेक्स पॉट्स आणि राजकीय आणि द्विपक्षीय व्यवहार विभागप्रमुख जॉन निकेल हे देखील उपस्थित होते. राजभवनातील अधिकाऱ्यांचे आभार मानून प्रिंन्स एडवर्ड पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात राजभवन येथे असलेले 'गव्हर्मेंट हाऊस' स्वातंत्र्यानंतर मुंबई राज्याचे आणि राज्य निर्मितीनंतर महाराष्ट्राचे राजभवन झाले.

हेही वाचा -

  1. प्रिन्स फिलिप यांचे भारताशी खास नाते, जालीयनवाला बाग हत्याकांडावर केले होते वादग्रस्त वक्तव्य
  2. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.