ठाणे Vinod Kambli Discharged : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती खालावल्यानं त्याला ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता दहा दिवसांच्या उपचारानंतर त्याला ठाण्यातील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, मात्र व्हिडिओ समोर आला आहे. याप्रसंगी अनेक चाहते कारमध्ये बसून त्याचा व्हिडिओ बनवत होते. कांबळीनं यावेळी सर्वांच्या शुभेच्छाही स्वीकारल्या.
काय म्हणाला विनोद कांबळी : विनोद कांबळीनं नववर्षात नागरिकांनी दारु व इतर नशा यापासून दूर राहावं, असा संदेश दिला आहे. कोणतंही व्यसन आयुष्य उद्ध्वस्त करु शकते. तसंच लवकरच मैदानात परतणार असल्याचंही त्यानं म्हटलंय. रुग्णालयातही त्यानं भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालून बॅट घेऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच यावेळी त्यानं टीम इंडियाची जर्सी घालून फलंदाजीही केली.
सचिन तेंडुलकरसोबतचा व्हिडिओ झाला होता व्हायरल : 2024 च्या डिसेंबर महिन्यात त्याची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला लघवीचा त्रास होत होता आणि शरीरात पेटकेही येत होते. नंतर त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्याही झाल्याचं आढळून आलं. याआधीही तो त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांमुळं चिंतेत होता. अलीकडेच प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमात सचिन तेंडुलकरला भेटतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो सचिनला त्याच्याजवळ बसण्यास सांगतो, पण तो पुढं जातो. या कार्यक्रमात तो खूपच कमजोर दिसत होता.
विनोद कांबळीची कारकीर्द कशी : विनोद कांबळीनं भारतीय संघाकडून कसोटी आणि वनडे अशा दोन्ही प्रकारात क्रिकेट खेळला आहे. त्यानं 1991 मध्ये भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर 2000 साली शेवटचा वनडे सामना खेळला गेला. त्यानं भारतीय संघासाठी 104 वनडे सामन्यांमध्ये 2477 धावा केल्या आहेत. याशिवाय 17 कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 1084 धावा आहेत ज्यात 4 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा :