शिर्डी : नवीन वर्षाची सुरुवात साई दर्शनानं करण्यासाठी देश-विदेशातील भाविक आज शिर्डीत दाखल झाले आहेत. यातून शिर्डीच्या अर्थकारणाला चालना मिळाली आहे. अश्यातच भक्तांना साईंच्या आशीर्वादाबरोबरच तृतीयपंथीही आशीर्वाद देण्यासाठी दाखल झाले. वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी झालेल्या कमाईतून काही हिस्सा दान करत आपली साईबाबा प्रती असलेली भक्ती हे तृतीयपंथी दानातून व्यक्त करत असल्याचं दिसून आलय.
शिर्डीत राज्यभरातील तृतीयपंथी दाखल : सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत साईबाबा दर्शनानं करण्यासाठी शिर्डीत मोठी गर्दी होते. या गर्दीमुळे आपल्याही पदरी चार पैसे मिळावे, आपल्याकडूनही साईंची भक्ती व्हावी यासाठी शिर्डीत दरवर्षी श्रीरामपूरसह राज्यभरातील तृतीयपंथी दाखल होतात. शिर्डीत साईदर्शनानंतर परिसरात उभ्या असलेल्या या तृतीयपंथीयांकडूनही अनेक भक्त आशीर्वाद घेताना दिसून येतात.
कमाईतील काही रक्कम साईबाबांना दान करण्याची प्रथा : यावर्षी श्रीरामपूर येथील 70 ते 80 तृतीयपंथी शिर्डीत आले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देत भाविकांना हे तृतीयपंथी आशीर्वाद देतात. त्यांच्याकडून मंगती मागताना तृतीयपंथीय मंदिराच्या चारही बाजूंना उभे राहात चार पैसे पदरी पाडत असल्याचं दिसून आलंय. शिर्डीला आलेला प्रत्येक साईभक्त साईचरणी आपल्या इच्छेप्रमाणं दान करत असतो. तसंच शिर्डीत होणाऱ्या गर्दीमुळे शिर्डीत मोठी आर्थिक उलाढालही होते. वर्षभर या तृतीयपंथींनी केलेल्या कमाईतील काही रक्कम साईंना दान करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. आपल्या व्यवसायाची सुरुवातही हे तृतीयपंथी साई दर्शनानंतर करतात. साईंचे हे अनोखे भक्त प्रत्येक नववर्षाच्या पहिल्या दिवशी शिर्डीत बघावयास मिळतात.
हेही वाचा :
- 'पीएसआय' परीक्षा उत्तीर्ण होऊनही 'एमपीएससी'नं नोकरी नाकारली, तृतीयपंथी वीणा काशिदच्या संघर्षाला न्याय मिळणार का? - MPSC Rejected Transgender Job
- 'आर्यन'चं 'अनाया' होण्याआधी 'या' दिग्गज क्रिकेटपटूनं बदललं होतं लिंग
- प्रविणचा 'रिया' होण्यापर्यंतचा खडतर प्रवास; तृतीयपंथी शिक्षिका 'रिया आळवेकर' - Transgender teacher