दुबई ICC Rankings Update : नवीन वर्षाच्या सुरुवातीला आयसीसीनं नवीनतम क्रमवारी जाहीर केली आहे. खराब कामगिरीमुळं या क्रमवारीत भारतीय फलंदाजांचं नुकसान झालं असतानाच भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहनं आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर नवा इतिहास रचला आहे. जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवत नवा विक्रम रचला आहे. बुमराह अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथं आजपर्यंत कोणताही भारतीय गोलंदाज पोहोचू शकला नाही.
India star smashes rankings record after Boxing Day Test exploits 💪https://t.co/EzHceJFkxZ
— ICC (@ICC) January 1, 2025
बुमराहचा नवा विक्रम : बॉक्सिंग-डे कसोटीत 5 बळींसह एकूण 9 विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं अव्वल स्थानावर आपली पकड आणखी मजबूत केली आहे. एवढंच नाही तर जसप्रीत बुमराहनं ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारतासाठी आतापर्यंतचे सर्वाधिक 907 रेटिंग गुण मिळवले आहेत. याआधी, कोणत्याही भारतीय गोलंदाजाला कसोटी क्रिकेटमध्ये ICC क्रमवारीत 904 पेक्षा जास्त रेटिंग गुण मिळवता आले नव्हते. आयसीसी कसोटी क्रमवारीत सर्वोत्तम रेटिंग गुण मिळवणारा पॅट कमिन्स हा एकमेव सक्रिय क्रिकेटपटू आहे. कमिन्सच्या नावावर ऑगस्ट 2019 मध्ये 914 रेटिंग गुण होते.
🚨 JASPRIT BUMRAH - INDIA'S HIGHEST RATED BOWLER IN HISTORY WITH 907 POINTS. 🚨 pic.twitter.com/M3CVxSYnrW
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 1, 2025
बुमराहनं सर्वांना सोडलं मागे : फक्त एका आठवड्यापूर्वी, जसप्रीत बुमराह आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत 904 रेटिंग गुण मिळवणारा दुसरा भारतीय बनला आणि रविचंद्रन अश्विनच्या विक्रमाची बरोबरी केली होती. अश्विनला डिसेंबर 2016 मध्ये 904 रेटिंग गुण मिळाले होते. आता बुमराहनं 907 रेटिंग मिळवून भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्ये सर्वोत्तम रेटिंगच्या रुपात बुमराहला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीचं बक्षीस मिळालं आहे. या मालिकेत त्यानं आतापर्यंत 4 सामन्यांच्या 8 डावात 30 बळी घेतले आहेत.
Highest Ever Ratings for India in ICC Test Rankings History:
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 1, 2025
In Batting - Virat Kohli (937).
In Bowling - Jasprit Bumrah (907).
- Two GOATs of Cricket..!!!! 🐐 pic.twitter.com/JQIzraxDu0
कांगारु गोलंदाजांनाही फायदा : जसप्रीत बुमराह नंबर-1 कसोटी गोलंदाज म्हणून अव्वल स्थानावर आहे तर पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी एक स्थानाचा फायदा झाला आहे. हेझलवूड दुसऱ्या स्थानावर तर कमिन्स तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कागिसो रबाडानं 2 स्थान गमावले असून तो चौथ्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मार्को यान्सननं 6 स्थानांची मोठी झेप घेत 5वं स्थान काबीज केलं आहे. बुमराह व्यतिरिक्त रवींद्र जडेजा टॉप-10 कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसरा भारतीय गोलंदाज आहे. जडेजा 10 व्या स्थानावर आहे.
Highest Ever Ratings for India in ICC Test Bowling Rankings:
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 1, 2025
Jasprit Bumrah - 907*
Ravi Ashwin - 904
- BUMRAH NOW HIGHEST EVER IN HISTORY...!!!! 🐐🫡 pic.twitter.com/HDXvNxWZku
कसोटीत सर्वोच्च रेटिंग गुण असलेले भारतीय गोलंदाज :
- 907 - जसप्रीत बुमराह 2024
- 904 - आर अश्विन 2016
- 899 - रवींद्र जडेजा 2017
- 877 - कपिल देव 1980
- 859 - अनिल कुंबळे 1994
- 811 - विनू मांकड 1952
- 806 - सुभाष गुप्ते 1956
हेही वाचा :