महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

युझवेंद्र चहलनं रचला इतिहास; ऋषभ पंतचा बळी घेत पठ्ठ्यानं टी20 क्रिकेटमध्ये केली 'अशी' कामगिरी - Yuzvendra Chahal Creates History - YUZVENDRA CHAHAL CREATES HISTORY

Yuzvendra Chahal Creates History : आयपीएल हंगामातील 56 वा टी20 सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मंगळवारी अरुण जेटली मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज युझवेंद्र चहल यानं इतिहास रचला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतचा बळी मिळवत युझवेंद्र चहलनं 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. टी20 क्रिकेटमध्ये 350 बळी घेणारा युझवेंद्र चहल हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

Yuzvendra Chahal Creates History
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat Marathi)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 11:11 AM IST

नवी दिल्ली Yuzvendra Chahal Creates History :आयपीएल हंगामातील 56 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात राजधानीतील अरुण जेटली मैदानावर मंगळवारी खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्लीच्या संघानं राजस्थान रॉयल्स संघावर 20 धावांनी मात केली. त्यासह दिल्ली संघानं प्ले ऑफमध्ये खेळण्याची आशा जीवंत ठेवली आहे. मात्र राजस्थान संघाला पराभवाचा सामना करावा लागला, तरी राजस्थानच्या युझवेंद्र चहलनं मोठा विक्रम केला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतचा बळी मिळवल्यानंतर युझवेंद्र चहलनं अनोखा इतिहास आपल्या नावावर केला आहे. टी20 क्रिकेटमध्ये 350 बळी घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

युझवेंद्र चहलनं रचला इतिहास :दिल्ली कॅपिटल्स संघाविरोधात खेळताना युझवेंद्र चहलनं दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतचा महत्वाचा एकमेव बळी मिळवला. मात्र या बळीसह युझवेंद्र चहलनं भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मोठा विक्रम आपल्या नावावर केला. युझवेंद्र चहल ही टी20 क्रिकेटमध्ये 350 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्यानं आतापर्यंत आपल्या फिरकी गोलंदाजीनं भल्याभल्या फलंदाजांच्या मुसक्या आवळल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये त्यानं उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं आहे.

या गोलंदाजांनीही घेतले 'इतके' बळी :युझवेंद्र चहल यानं दिल्ली कॅपिटल्स संघाविरोधात एक बळी मिळवून इतिहास रचला. मात्र युझवेंद्र चहल याच्यानंतरही अनेक भारतीय गोलंदाज तिनशेपेक्षा जास्त बळी मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. यात पियुष चावला यानं आतापर्यंत 310 बळी मिळवले आहेत. भारताचा आघाडीचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यानं टी20 क्रिकेटमध्ये 306 बळीचा टप्पा पार केला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यानं 297 बळी टिपले आहेत. तर अमित मिश्रानं 285 बळीचा टप्पा पार केला आहे.

दिल्लीनं राजस्थान संघाला 'पाजलं पाणी' :दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल संघात मंगळवारी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर आयपीएलचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली संघानं प्रथम फलंदाजी करत राजस्थान संघाला 222 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ 201 धावाचं करू शकला. राजस्थान संघाकडून संजू सॅमसननं जोरदार खेळी केली. मात्र संघाला विजयापर्यंत नेण्यात त्याला यश आलं नाही.

हेही वाचा :

  1. IPL 2022 Updates : चहल एका मोसमात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मोडू शकतो - ग्रॅम स्मिथ
  2. IPL 2022 Updates : मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्रिक पूर्ण न झाल्याने युझवेंद्र चहलची मोठी प्रतिक्रिया; जाणून घ्या काय म्हणाला
  3. Dhanashree and Yuzvendra पती युझवेंद्र चहलपासून विभक्त होण्याच्या अफवांवर धनश्रीने सोडले मौन, काय म्हणाली घ्या जाणून

ABOUT THE AUTHOR

...view details