नवी दिल्ली Team India T20I Squad Announced :बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) 28 सप्टेंबर (शनिवार) रोजी संघाची घोषणा केली. 15 सदस्यीय भारतीय संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. 6 ऑक्टोबरपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.
युवा खेळाडूंना संधी : वेगवान गोलंदाज मयंक यादवला प्रथमच भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आलीय. रियान पराग, शिवम दुबे, रवि बिष्णोई आणि हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती या युवा खेळाडूंनाही संघात स्थान मिळालं आहे. ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि ईशान किशन या तिघांना संधी मिळालेली नाही. तर ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांना या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.
भारत-बांगलादेश टी-20 मालिकेचं वेळापत्रक
- पहिला टी-20 सामना - ग्वाल्हेर, 6 ऑक्टोबर
- दुसरा टी-20 सामना - दिल्ली, 9 ऑक्टोबर
- तिसरा टी-20 सामना - हैदराबाद, 12 ऑक्टोबर