ऑकलॅंड New Zealand Cricket Team : न्यूझीलंड क्रिकेट संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवे आणि युवा स्टार सलामीवीर फिन ऍलन यांनी टी 20 लीगला प्राधान्य देत आपल्या राष्ट्रीय संघाचा केंद्रीय करार नाकारला आहे. त्यामुळं सध्या न्यूझीलंड क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.
कॉन्वेनं स्वत:ला दूर : कॉन्वेनं केंद्रीय करारापासून स्वतःला पूर्णपणे दूर केले नाही. न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि सध्याचा स्टार फलंदाज केन विल्यमसनप्रमाणे त्यानंही करार केला आहे. किवी संघासाठी जास्तीत जास्त सामन्यांमध्ये तो सहभागी होईल. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या प्रकारापासून कॉनवेनं स्वत:ला पूर्णपणे दूर केलं आहे. त्यादरम्यान कॉनवे आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या SA20 लीगमध्ये भाग घेईल.
फिन ऍलनंही नाकारला करार : कॉनवेप्रमाणेच फिन ऍलननंही न्यूझीलंडनं दिलेल्या केंद्रीय करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला बोर्डाकडून कोणतेही विशेष करार मिळालेले नाहीत. मात्र, गरज पडल्यास तो किवी संघात सहभागी होण्यास तयार आहे. डेव्हॉन कॉनवे चेन्नई सुपर किंग्जच्या वतीनं आयपीएलमध्ये भाग घेत आहे. इथं तो CSK संघाचा अविभाज्य भाग आहे. तर फिन ऍलन हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा भाग होता, मात्र सध्या ऍलन कोणत्याही आयपीएल फ्रँचायझीचा भाग नाही. आगामी हंगामात काही संघ निश्चितपणे त्यांचा ताफ्यात समावेश करतील अशी अपेक्षा आहे.
सहा खेळाडूंनी नाकारला करार : अलीकडेच, 2024 टी 20 विश्वचषकाच्या समाप्तीनंतर, माजी कर्णधार केन विल्यमसननं केंद्रीय करारास नकार दिला. त्यानंतर संघातील दोन स्टार वेगवान गोलंदाज ॲडम मिल्ने आणि लॉकी फर्ग्युसन यांनी यादीतून त्यांची नावं काढून टाकली. खेळाडूंनी केंद्रीय करारातून बाहेर पडणे ही न्यूझीलंड क्रिकेट बोर्डासाठी एक गंभीर समस्या बनली आहे. कारण सुमारे सहा खेळाडूंनी फ्रँचायझी लीग वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी केंद्रीय करारासाठी नकार दिला आहे.
हेही वाचा :
- भारताच्या 'या' दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी 15 ऑगस्ट रोजी क्रिकेटला केलं अलविदा; एकानं तर जिंकल्या 3 'आयसीसी ट्रॉफी' - Independence Day 2024
- दुलीप ट्रॉफीच्या संघांची घोषणा; मराठमोळ्या ऋतुराजच्या खांद्यावर एका संघाची जबाबदारी, आदित्य ठाकरेही उतरणार मैदानात - Duleep Trophy Squad