नवी दिल्ली : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. मात्र हे एन्काऊंटर फेक असल्याचं आता चौकशी समितीनं न्यायालयात दावा केला. त्यामुळे न्यायालयानं या प्रकऱणी पोच पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणावरुन शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा देणं सहज शक्य होतं, मात्र त्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. दिल्ली निवडणुकीवरुनही त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. दिल्लीला कोण जास्त मोठी थैली देते, त्यावरुन नेत्यांचं वजन ठरते, असं संजय राऊत म्हणाले.
दिल्लीला मोठी थैली देणाऱ्याचं ठरते वजन : उबाठा खासदार संजय राऊत यांनी आज नवी दिल्ली इथं विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. यावेळी संजय राऊत यांनी बोलताना सांगितलं की, दिल्लीला कोण मोठी थैली देते, त्यावरुन नेत्यांचं वजन ठरते. पालकमंत्री पदावरुनही संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. "राज्यात पालकमंत्री पदावरुन दंगल निर्माण होत आहे. मुख्यमंत्री हतबल आणि लाचार असल्याचं या स्थगितीमधून दिसत आहे. मुख्यमंत्री आपल्याच निर्णयांना स्थगिती देतात, हे आश्चर्य आहे," असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी यावेळी केला.
एन्काउंटर करण्याचे आदेश कोणी दिले : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केला. मात्र हा एन्काउंटर फेक असल्याचं आता न्यायालयीन चौकशी अहवालातून न्यायालयात स्पष्ट झालं. बदलापूर प्रकरणावरुन उबाठा खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. "एकनाथ शिंदेंच्या परवानगीशिवाय अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला का, एन्काउंटरचे आदेश कोणी दिले होते, पालकमंत्री कोण होतं, पालकमंत्र्यांवर कारवाई करा," अशी मागणी संजय राऊतांनी केली. "पश्चिम बंगालमध्ये फास्ट ट्रॅकमधून आरोपीवर कारवाई करण्यात आली," असंही त्यांनीही यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
- "कॅबिनेटमध्ये आता मारामाऱ्या अन् खून होणेच बाकी"; संजय राऊत म्हणतात, "आम्ही संपलो म्हणणारे काँग्रेस नेते तुम्ही..."
- 'सरकार प्रोटेक्शन मनी घेतंय का?' संतोष देशमुख हत्या प्रकरणात संजय राऊतांचा सवाल
- संजय राऊत रिकामटेकडे, मला कामं आहेत: महाराष्ट्राला प्रगतीकडं नेणं ध्येय, देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार हल्लाबोल