महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

'...तर मी आतंकवादी आहे', वर्धापन सोहळ्यात उद्धव ठाकरे असं का म्हणाले? - Shivsena Foundation Day - SHIVSENA FOUNDATION DAY

Shivsena Foundation Day : शिवसेना पक्षाचा आज 58 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झाला.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे (Social Media)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 8:36 PM IST

Updated : Jun 19, 2024, 10:42 PM IST

मुंबई Shivsena Foundation Day : शिवसेना पक्षाचा आज 58 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आता दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात येत आहेत. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार भास्कर मगरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं, तसंच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं. या मेळाव्याला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, खासदार संजय दिना पाटील, रश्मी ठाकरे यांच्यासह लोकसभा निवडणूक लढवलेले सर्व उमेदवार देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

मोंदींमध्ये अहंकार भरलाय : या मेळाव्यात पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. तेव्हा मी सर्वांचे आभार मानले आहेत. सर्व देशभक्तांना मी मनापासून धन्यवाद देत आहे. यशाचे खरी धनी तुम्ही आहात. मी कधीही स्वतःला मोठं मानले नाही. आत्मविश्वास आहे, आपल्यात अहंकार नाही. मोदींमध्ये अहंकार आहे. भाजपाला तडाखा बसला आहे. निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण सुरु आहे. उद्धव ठाकरे पुन्हा एनडीएत जाणार, ज्यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. त्या नालायकांसोबत जायचे आहे का? मी अजिबात कोणासोबत जाणार नाही." तसंच माझ्या वडिलांचा फोटो वापरुन तुम्ही स्ट्राईक रेट सांगता, तुमच्या बापाचा फोटो लावून दाखवाना, मग स्टाईक रेट सांगा, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केलाय. काही लोकांना उद्धव ठाकरे नको म्हणून 'बिनशर्ट' पाठिंबा दिला, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांनाही टोला लगावलाय.

तर मी आतंकवादी आहे : तसंच मध्यावधी निवडणूक लागली तर आपले शिलेदार खासदार होतील. हे सरकार चालेल असं वाटत नाही. चालू नये असंच वाटतं. सरकार चालेल का पडेल का नाही, पडलंच पाहिजे. पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजे. पडलं तर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापनक करू, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला. तसंच 'लोकशाही वाचवा' हा आंतकवाद असेल तर मी आंतकवादी आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. शिवसेनेला मुस्लिम मतं मिळाली. सर्व देशभक्तांची मतं मिळाली. मी हिंदुत्व सोडलं नाही. देशभक्तांनी संविधान आणि देश वाचवण्यासाठी मला देशभक्तांनी मतदान केलं, असंही ठाकरेंनी म्हटलंय.

संजय राऊतांची मोदींवर टीका : या मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "मोदी आणि शाह यांचा पराभव अशक्य आहे. जन्मला येतानाच ते 400 खुळखुळे घेऊन आलेले आहेत. पण भाजपाचा खरा खुळखुळा हा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेना संपणार नाही. ते शिवसेना संपवायला निघाले होते." तसंच आमचा 58 वा वाढदिवस दिवस आहे. त्यांचा अडीच वर्ष आहे. पण त्यांना पुढं तोही होतो की नाही हे माहिती नाही, असं म्हणत राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली. गुजरातचे सोमे गोमे येऊन शिवसेनेवर वार करु लागलेत, त्यांना ते जमणार नाही. शिवसेनेचा खरा वारसा हा उद्धव ठाकरे यांनी चालवला. नरेंद्र मोदी बहुमुक्त केल्याबद्दल भाजपानं धन्यवाद यात्रा काढली आहे. मोदी हा ब्रँड होता, आता ती ब्रँडी झाली. त्या ब्रँडीचे दोन दोन घोट मारतात. अन् ते धन्यवाद यात्रा काढतात, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवरही जोरदार टीका केलीय.

हेही वाचा :

  1. एकनाथ शिंदे यांचे बंड ते लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत शिवसेनेत काय वादळे आली? जाणून घ्या सविस्तर - Shiv Sena Foundation Day 2024
  2. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून वर्धापनदिनानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन; विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार? - Shiv Sena Foundation Day 2024
Last Updated : Jun 19, 2024, 10:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details