ETV Bharat / politics

बीड सरपंच हत्या प्रकरणात राजकीय वातावरण तापलं, सुरेश धस आणि वाघमारे यांनी केली टीका - NAVNATH WAGHMARE AND SURESH DHAS

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आता नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस आणि नवनाथ वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Navnath Waghmare And Suresh Dhas
नवनाथ वाघमारे आणि सुरेश धस (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 16 hours ago

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 18 दिवस पूर्ण झाले आहेत. अजूनही सर्व आरोपींना अटक करण्यात आली नाही. याप्रकरणात सतत गंभीर आरोप हे केले जात आहेत. याप्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज बीडमध्ये पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. संतोष देशमुख यांचा खून करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी केली.

राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू : बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला राजकीय रंग देऊन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे आणि मनोज जरांगे तो प्रयत्न करत आहेत. तर संतोष देशमुख प्रकरणातील व्यक्तीना कठोर शिक्षा झाली पाहिजे. केवळ मंत्री पद न मिळाल्यानं सुरेश धसांच्या पोटात गोळा उठला आहे, अशी प्रतिक्रिया नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया देताना नवनाथ वाघमारे आणि सुरेश धस (ETV Bharat Reporter)

"अमोल मिटकरी फार लहान आहे. माझी त्याला एकदा विनंती आहे की, अमोल तू कोणाच्याही नादी लाग पण या रगेलच्या नादी लागू नको. तुला लय महागात पडेल. मी एकदा आता त्याचं ऐकून घेतो. वडीलकीच्या नात्याने त्याला एकदा समज देतो. तुझं कोणीकडेही दुकान चालव, पण माझ्याकडं दुकान चालवू नको," - सुरेश धस, आमदार

धस यांची धनंजय मुंडेंवर टीका : सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. परळीत अनेक गायरान जमिनींवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. विटभट्ट्या, जमीन बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला जात आहे. त्यातून इव्हेंट मॅनेजमेंट केलं जातं. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना इथे आणलं जातं. जर कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचं असेल त्यांनी परळीत यावं आणि याचा प्रसार देशभरात करावा, अशीही खोचक टीका धनंजय मुंडे यांच्यावर धस यांनी केली.

हेही वाचा -

  1. सरपंच देशमुखांच्या खुनाचे आरोपी 18 दिवसानंतरही मोकाट; बीडचे नागरिक काढणार भव्य मोर्चा
  2. "संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी"; पहिल्या दिवसापासून माझी मागणी, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
  3. संतोष देशमुख हत्या प्रकरण: खाते वाटपापूर्वीच धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ? सुरेश धस नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.