महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"शाहू महाराज खरे वारसदार नाहीत"; संजय मंडलिक यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा सतेज पाटलांनी घेतला समाचार - lok sabha election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांचे शाहू महाराजांवरील वक्तव्य म्हणजे कोल्हापूरच्या शाहू महाराजांचा अपमान आहे. त्यामुळं संजय मंडलिक यांनी या वक्तव्यावर माफी मागावी, अशी मागणी सतेज पाटील (Satej Patil) यांनी केलीय.

Lok Sabha Election 2024
आमदार सतेज पाटील

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 8:58 PM IST

Updated : Apr 11, 2024, 9:07 PM IST

प्रतिक्रिया देताना आमदार सतेज पाटील

कोल्हापूर lok sabha election 2024 : श्रीमंत शाहू महाराज कोल्हापूरचे आहेत का? ते राजर्षी शाहू महाराजांचे खरे वारसदार आहेत का? ते दत्तक आहेत, असं वादग्रस्त विधान महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी प्रचारादरम्यान केलंय. गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथे मंडलिक बोलत होते. दरम्यान, खासदार मंडलिक यांच्या वक्तव्याचा काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी समाचार घेतलाय. शाहू महाराजांचा अपमान कोल्हापूरकर सहन करणार नाहीत, खासदार मंडलिक यांनी त्वरित माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

शाहू महाराज मूळचे कोल्हापूरचे नाहीत : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी महाआघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "शाहू महाराज मूळचे कोल्हापूरचे नाहीत, कोल्हापूरच्या गादीवर ते दत्तक आले आहेत," असं विधान केलं. यावेळी बोलताना मंडलिक यांनी "कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात दोन मल्ल आमने-सामने आहेत. समोरच्या मल्लाला हातच लावायचा नाही, टांगच मारायची नाही, मग कुस्ती कशी होणार?" असा सवालही या प्रचार सभेत मांडलिक यांनी उपस्थित केला होता.

शाहू महाराज कोल्हापूरची अस्मिता : खासदार मंडलिक यांनी शाहू महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता कोल्हापुरात उमटायला सुरू झाले आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी खासदार मंडलिकांना टार्गेट करत त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. निवडणुकीला सुरुवात झाली तेव्हाच जिल्ह्यातील नेत्यांनी शाहू महाराजांबद्दल आदर व्यक्त करत त्यांच्यावर कोणतीही टीका न करण्याचं ठरवलं होतं. मात्र, आता खासदार मंडलिकांचा सल्लागार कोण? त्यांना चिट्ठी कोण लिहून देत आहे? याचा शोध घेतला पाहिजे. शाहू महाराज कोल्हापूरची अस्मिता आहे. त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, सुरुवात महायुतीनं केली आहे, आता त्याचा शेवट आम्ही करू, असा इशारा पाटील यांनी दिलाय.

मुख्यमंत्र्यांचा गोकुळच्या अध्यक्षांना फोन : जिल्ह्यातील दोन्ही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीत दोन्ही खासदार निवडून यावेत यासाठी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांना फोन करून दोन्ही उमेदवारांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यातील संभाषण सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री शिंदे जिल्ह्यात आपल्या उमेदवारांसाठी फिल्डिंग लावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा -

  1. देशपातळीवर पक्ष फोडाफोडीचं पेटंट फक्त भाजपाकडे, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची टीका - Congress MLA Satej Patil
  2. खासदारांनी भाकित कधीपासून सांगायला सुरुवात केली, आमदार सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर - Satej Patil
  3. Direct Pipeline : थेट पाईपलाईनवरून भाजपा खासदार धनंजय महाडिक अन् काँग्रेस आमदार सतेज पाटलांमध्ये वार-पलटवार
Last Updated : Apr 11, 2024, 9:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details