बीड : संतोष देशमुख खून प्रकरणातील सातही आरोपीवर मोक्का लावण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे यामध्ये सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, सिद्धार्थ सोनवणे या आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी असून यामध्ये वाल्मिक कराडवर मोक्काअंतर्गत कारवाई केलेली नाही.
वाल्मिक कराडवर मोक्का नाही : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत खटला चालवणार आहे. एसआयटीनं हा मोक्का लावला असून त्यांच्याकडं या प्रकरणाचा तपास आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. पण वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही. म्हणून वाल्मिक कराडवर मोक्का लावलेला नाही.
राज्यसभर निघाले मोर्चे : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारनं एसआयटी आणि सीआयडीकडं दिला आहे. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली होती. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी राज्यसभरात मोर्चे निघत आहेत. आज धाराशिव येथे देखील संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्यातील जालना, परभणी, पुणे या ठिकाणी देखील मोर्चे काढण्यात आले होते. अखेर समाजाचा दबाव पाहता या आरोपीवर मोक्का लावण्यात आलेला आहे.
विष्णू चाटेला दोन दिवसांची सीआयडी कोठडी : संतोष देशमुख खून प्रकरणातील खंडणी गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटेला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दोन दिवसाची सीआयडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळं आता दोन दिवसानंतर नेमकं काय होणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा -
- संतोष देशमुख हत्याकांड : आरोपी विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; खासदार सोनवणेंच्या पाठपुराव्यानंतर मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल
- संतोष देशमुख हत्या प्रकरण: "धनंजय मुंडे यांचं नाव डायरेक्ट...", नेमंक काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
- संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, काय झालं भेटीत?