ETV Bharat / state

महाराष्ट्रातले 'पद्म' पुरस्कार विजेते 'ईटीव्ही भारत'वर Exclusive; जाणून घ्या प्रतिक्रिया... - PADMA AWARDS 2025

केंद्र सरकारनं 'पद्म' पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्रातील कला, साहित्य, सामाजिक क्षेत्रांतील दिग्गजांना 'पद्म' पुरस्कार जाहीर झाले आहेत.

padma award
'पद्म' पुरस्कार विजेते (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2025, 10:32 PM IST

Updated : Jan 26, 2025, 3:52 PM IST

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून 'पद्म' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रात विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना 'पद्म' पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना 'पद्मश्री' पुरस्कार, तसेच प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ 'अरण्यऋषी' असं ज्यांना आदराने संबोधलं जातं असे वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांना देखील 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला. त्याचबरोबर वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चैत्राम पवार यांना देखील 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांनाही 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाले आहेत.

मनोहर जोशी यांना मरणोत्तर 'पद्मभूषण' : देशाच्या लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर 'पद्मभूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेश जोशी यांनी ईटीव्ही भारतला खास प्रतिक्रिया दिली. "हा पुरस्कार उशिरा मिळाला हे खरं असलं तरी मिळाला याचा आनंद आहे. हा पुरस्कार स्वीकारायला 'सर' असते तर जास्त आनंद झाला असता. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण अशी शिकवण बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आणि सरांनी देखील त्यावर मार्गक्रमण केलं. या कार्याची मोदी सरकारनं पोचपावती दिली. नरेंद्र मोदी यांचे खूप खूप आभार," या शब्दांत उन्मेश जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची खास प्रतिक्रिया (ETV Bharat)

अशोक सराफ यांची खास प्रतिक्रिया : रंगभूमी, चित्रपट आणि मालिकाविश्वातले चतुरस्त्र अभिनेते अशोक सराफ यांच्या आयुष्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षात त्यांच्यावर पुरस्कारांची बरसात झाली. काही महिन्यांपूर्वी अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. आता त्यांना देशातला चौथा सर्वोच्च नागरी सन्मान 'पद्मश्री' जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांनी खास 'ईटीव्ही भारत'ला प्रतिक्रिया दिली. 'महाराष्ट्र भूषण'नंतर आता 'पद्मश्री' पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे. यात माझं काही नसून तुम्हा सर्वांच्या सदिच्छा सोबत आहेत,"असं ते म्हणाले. पुरस्कारानं मनोरंजन करायला बळ किंवा जबाबदारी वाढली असं वाटतं का? यावर अशोक सराफ म्हणाले, "या पुरस्कारानं बळ मिळेल. जीव तोडून मेहनत करुन काहीतरी नवीन करण्याचा नेहमीच प्रयत्न केला."

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार वासुदेव कामत यांची प्रतिक्रिया (Source -ETV Bharat)

'पद्मश्री' पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर सुलेखनकार अच्युत पालव यांची 'ईटीव्ही भारत'ला 'एक्स्लुसिव्ह' प्रतिक्रिया

"१९७३ साली पहिल्यांदा शाळेच्या फळ्यावर सुविचार लिहायला घेतला. तो प्रवास आज 'पद्मश्री ' पुरस्कारापर्यंत पोहोचला, याचा खूप आनंद आहे. मी अक्षरांची पाठ सोडली नाही, अक्षरांनी माझ्यावर कृपा केली. शालेय विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळाली आणि अक्षरांवर प्रेम करणारी पिढी तयार झाली तर माझ्या तपश्चर्येचं सार्थक होईल."

'पद्मश्री' पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार वासुदेव कामत यांची 'ईटीव्ही भारत' ला 'एक्स्लुसिव्ह' प्रतिक्रिया

"एक चित्रकार म्हणून आनंद होतोच. पण दृश्यकलेला हा पुरस्कार मिळतोय, याचा जास्त आनंद वाटतोय. चित्रपट आणि संगीतक्षेत्रासाठी पुरस्कार दिले जातात. अर्थात ते योग्यच आहे. त्यांच्या योगदानाबद्दल गौरव व्हायलाच हवा. महाराष्ट्राच्या उत्कर्षात दृश्यकलेचं मोठं योगदान आहे. विशेष म्हणजे सुलेखनकार अच्युत पालन यांनाही पुरस्कार जाहीर झालाय. आम्हा दोन चित्रकारांचा गौरव होतोय, याचं समाधान आहे."

मारुती चित्तमपल्ली यांचा सन्मान : सोलापूरचे सुपुत्र, 'अरण्यऋषी' मारुती चित्तमपल्ली यांना केंद्र शासनाकडून 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला. सोलापूरच्या दृष्टीनं ही खूपच अभिमानाची बाब आहे. वनविभागात सेवा करता करता मारुती चित्तमपल्ली यांनी पक्षी, प्राणी आणि वनसंपदेविषयी अभ्यास करून अनेक पुस्तके लिहिली आहेत. मारुती चित्तमपल्ली यांच्यामुळे मराठी शब्दकोशात अनेक शब्दांची भर पडली. मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदी त्यांनी भूषवलं होतं.

बासरी वादक पंडित रोनू मुझुमदार यांची खास प्रतिक्रिया (ETV Bharat)

कोण आहेत मारुती चितमपल्ली? : मूळचे सोलापूरचे असणारे मारुती चितमपल्ली यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३२ रोजी झाला. मारुती यांनी अनेक वर्षे वनाधिकारी म्हणून काम करत मराठी साहित्याला एक लाख शब्द दिले. प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ, अवघं जीवन वनविद्येचा अभ्यास आणि लेखनासाठी समर्पित करणारे व्यासंगी संशोधक आणि वनाधिकारी म्हणून मारुती चितमपल्ली यांची ओळख आहे. सोलापूर येथे एका गिरणी कामगाराच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मारुती भुजंगराव चितमपल्ली हे त्यांचं पूर्ण नाव. चितमपल्ली यांच्या वडिलांना वाचनाचा छंद होता. शिक्षणाचे महत्त्व ते जाणून होते. आपल्या मुलांनी विणकामाचे साचे चालवू नयेत, त्यांनी शिकावे ही त्यांची इच्छा होती. अभ्यासाचा वारसा घरातून चितमपल्ली यांना लाभला होता. त्यांच्या पूर्वजांकडून झाडे लावणे, झाडांवर प्रेम करणे या गोष्टी त्यांना मिळाल्या.लिंबामामा हे त्यांचे अरण्यविद्येतले गुरू होते.

हेही वाचा - केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील 'या' दिग्गजांचा सन्मान

Last Updated : Jan 26, 2025, 3:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.