महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

शरद पवार जातीपातीचं राजकारण करत नाही; रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती - RAMDAS ATHAWALE ON SHARAD PAWAR

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. यावेळी रामदास आठवले यांनी शरद पवार यांच्यावरील जातीपातीच्या राजकारणाचा आरोप खोटा असल्याची प्रतिक्रिया दिलीय.

Ramdas Athawale on Sharad Pawar
शरद पवार आणि रामदास आठवले (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2024, 8:04 PM IST

पुणे :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत, शरद पवार हे जातीयवादाचे आद्य संत असल्याचं म्हटलं होतं. यावर रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले म्हणाले, "शरद पवार जातीपातीचं राजकारण करतात असं मला वाटत नाही. आम्ही त्यांच्यासोबत राहिलेलो आहे. प्रत्येकच पक्ष उमेदवार देताना जातीचा विचार करतो. शरद पवारांवर असलेले आरोप मला मान्य नाहीत. मात्र काँग्रेसनं जातिवाद संपुष्टात आणला नाही, तो संपुष्टात यावा अशी आमची अपेक्षा आहे". पुण्यात आज रामदास आठवले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.


हेलिकॉप्टर आणि बॅग चेक केली : यावेळी रामदास आठवले म्हणाले, "मी आज संगोल्याला गेलो होतो. तसंच दोन दिवसांपूर्वी लातूरला गेलो या दोन्ही ठिकाणी निवडणूक आयोगानं माझी बॅग आणि हेलिकॉप्टर देखील चेक केलं. हा विषय निवडणूक आयोगाचा असून सरकारचा अजिबात नाही. फक्त उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर चेक केलं असं नाही". त्यामुळं या विषयाचा राजकीय बाऊ करू नये आणि अशा गोष्टींना आपण समोर गेलं पाहिजे.

प्रतिक्रिया देताना रामदास आठवले (ETV Bharat Reporter)



महायुतीकडून आमच्यावर अन्याय होऊ नये : ते पुढे म्हणाले, "या विधानसभा निवडणुकीत माझ्या पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. 4 ते 5 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती. काही कार्यकर्ते नाराज होते. आपल्याला सत्तेत सहभाग मिळणार आहे असं मी त्यांना सांगितलं आणि ते कामाला लागलेले आहेत. जे लागलेले नाहीत त्यांनी महायुतीचे काम सुरू करावं. तसंच पुढे तरी महायुतीकडून आमच्यावर अन्याय होऊ नये याबाबत मी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी बोलणार असल्याचं आठवले म्हणाले.

हेही वाचा -

  1. गौतम अदानी अमित शाह यांची बैठक, मात्र त्यात शरद पवार नव्हते; संजय राऊतांचा दावा
  2. "ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी"; विखेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांची फटकेबाजी
  3. गौतम अदानींसोबत शरद पवारांची बैठक ही वस्तुस्थिती; मंत्री हसन मुश्रीफांनी केली अजित पवारांची पाठराखण

ABOUT THE AUTHOR

...view details