नवी दिल्ली- लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील मतदारांच्या यादीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्राच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे आहेत, असा प्रश्नदेखील राहुल गांधींनी उपस्थित केला. या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले "आम्ही निवडणूक आयोगाला वारंवार अनियमितता आढळल्याचं सांगत आलो आहोत. आम्हाला महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा मतदारांची नावे आणि पत्ते मतदार यादी हवी आहे. कारण आम्हाला हे नवीन मतदार नेमके कोण आहेत, हे समजून घ्यायचे आहे. अनेक मतदारांना यादीतून वगळण्यात आलं आहे. बूथवरील काही मतदारांना दुसऱ्या बूथवर स्थानांतरित करण्यात आलं आहे. यापैकी बहुतेक मतदार मागासवर्गीय समुदाय, आदिवासी समुदाय आणि अल्पसंख्याक समुदायातील आहेत.
#WATCH | Delhi | Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, " we represent on this table - the entire opposition that fought the last election in maharashtra. we are going to bring some information about the election. we studied the details - the voters and the voting list.… pic.twitter.com/OeDR2NeKT1
— ANI (@ANI) February 7, 2025
निवडणूक आयोगाकडून आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांनी काहीतरी चूक केल्यामुळे उत्तर दिलं जात नाही. मी निवडणूक आयोगावर कोणतेही आरोप करत नाही. मी येथे स्पष्टपणे आकडेवारी सादर करत आहे. त्यांनी मतदार यादी दिली तर आम्हाला तर्कावर आधारित निष्कर्ष काढता येईल-लोकसभेचे विरोधी पक्षनेते, राहुल गांधी
#WATCH | Delhi | Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, " if the election commission of the country is 'alive' - they must answer what rahul gandhi ji has asked. but, the election commission won't reply as they have become the slave of the govt which was formed... from where… pic.twitter.com/dj9i9dm8IM
— ANI (@ANI) February 7, 2025
वाढलेली मतदारसंख्या हिमाचलच्या लोकसंख्येएवढी- पुढे खासदार गांधी म्हणाले, "२०१९ च्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ५ वर्षांत ३२ लाख मतदार वाढले. तथापि, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत य३९ लाख मतदार जोडले गेले. हे ३९ लाख मतदार कोण आहेत? ही मतदारसंख्या हिमाचल प्रदेशच्या एकूण मतदारांच्या संख्येइतकी आहे. दुसरा मुद्दा आहे की, महाराष्ट्रात राज्यातील एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे आहेत? महाराष्ट्रात अचानक मतदार वाढले आहेत."
#WATCH | Delhi | NCP-SCP leader Supriya Sule says, " ...we want re-elections on the ballot paper to be held even at those constituencies where our candidates have won... 11 seats are such where we lost the elections because of confusion between party symbols. even the party in… pic.twitter.com/FzZ7rS9wwc
— ANI (@ANI) February 7, 2025
निवडणूक आयोगानं निष्पक्ष राहावं- राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष गट) नेत्या तथा खासदा सुप्रिया सुळे यांनी म्हटलं , "आम्हाला मतपत्रिकेवर पुन्हा निवडणुका घ्यायच्या आहेत. ११ जागांवर तुतारीच्या पक्षचिन्हांमधील गोंधळामुळे आम्ही निवडणूक पराभूत झालो. हे सत्तेत असलेल्या पक्षानंही मान्य केलं आहे. 'तुतारी' हे चिन्ह बदलण्यासाठी आम्ही अनेक विनंत्या करूनही मान्यता दिली नाही. निवडणूक आयोगानं निष्पक्ष राहावं, अशी आम्ही मागणी करतो."
निवडणूक आयोग सरकारचे गुलाम- शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. तेम म्हणाले, "जर देशाचा निवडणूक आयोग 'जिवंत' असेल तर त्यांनी राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यावं. परंतु, निवडणूक आयोगाकडून उत्तर दिलं जाणार नाही. कारण ते स्थापन झालेल्या सरकारचे गुलाम झाले आहेत. महाराष्ट्रातील अतिरिक्त ३९ लाख मतदार कुठे जातील? ते बिहारला जातील."
राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- हिमाचलप्रदेशच्या लोकसंख्येएवढे मतदार महाराष्ट्रातील मतदार यादीत वाढले.
- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक गैरप्रकार आढळले.
- ९ कोटी ५४ लाख लोकसंख्या असताना मतदार त्याहून जास्त आहेत.
- ५ महिन्यात वाढलेले मतदार कोण आहेत?
- निवडणुकीत अनेक अनियमितता आहेत.
- पंतप्रधानांनी निवडणूक आयुक्त निवडच्या पद्धत बदलली.
- निवडणूक आयोगाकडून आम्हाला लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारांची नाव, पत्त्यासह मतदार यादी मिळावी.
- निवडणूक आयोगाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही.
- राज्यातील तीन प्रमुख विरोधी पक्षांकडून विधानसभा आणि लोकसभा उमेदवारांच्या यादी मागण्यात करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाकडून देण्यात येणार लेखी उत्तर- राहुल गांधी यांच्या आरोपावर निवडणूक आयोगाकडून लेखी स्वरुपात उत्तर दिलं जाणार आहे. निवडणूक आयोगानं एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं, " निवडणूक आयोग राजकीय पक्षांना महत्त्वाचं भागधारक मानते. राजकीय पक्षांकडून येणारे विचार, सूचना आणि प्रश्न यांना मनापासून महत्त्व देतं. आयोगाकडून देशभरात एकसमान स्वीकारल्या जाणाऱ्या प्रक्रियेची संपूर्ण तथ्यात्मक माहिती आकडेवारीसह लेखी स्वरूपात प्रतिसाद दिली जाईल."
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींना लगावला टोला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेवर टीका केली. ते म्हणाले, "किती मतदार वाढले, कसे वाढले याचं निवडणूक आयोगानं उत्तर दिलं आहे. दिल्लीत त्यांचा प्रचंड पराभव होत असल्यानं राहुल गांधी कव्हर फायरिंग करत आहेत. जोपर्यंत आत्मचिंतन करणार नाहीत, तोपर्यंत जनतेकडून त्यांना समर्थन मिळणार नाही. मतदार यादीबाबत निवडणूक आयोगाकडून उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे वेगळे बोलणार नाही. राहुल गांधी यांनी पराभवाबाबत आत्मचिंतन करावे," असा टोलावजा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
हेही वाचा-